महाराष्ट्र यवतमाळ सामाजिक

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अमरावती येथे मध्यस्थी केंद्राची स्थापना

 अमरावती (प्रतिनिधी)

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अमरावती येथे मध्यस्थी केंद्राची स्थापना

अमरावती येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. संतोष काकडे यांच्या हस्ते जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे मध्यस्थी केंद्राची ग्राहक संरक्षण कायदा,2019 चे तरतुदीनुसार स्थापना करण्यात आली असून ऍड. नंदकिशोर कलंत्री व ऍड.डॉ. रविंद्र उल्हास मराठे यांची मध्यस्थी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. संतोष काकडे यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग परिक्रमा खंडपीठ अमरावती येथे दि.21/1/2022 रोजी परिक्रमा खंडपिठाचे कामकाज घेतले. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अमरावतीच्या कार्यालयाचे अवलोकन करून कामकाजाचा आढावा घेऊन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थित वकील वर्गांने महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष यांना राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग परिक्रमा खंडपिठ अमरावती येथील कामकाज नियमीत करण्याबाबत विनंती केली. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष यांनी सुद्धा राज्य आयोगाचे कामकाज नियमीत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले तसेच दरमहिन्याला राज्य आयोगाचे कामकाज किमान एकदिवस चालवणार असल्याचा विश्‍वास दिला. दि.18-2-2022 रोजी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग परिक्रमा खंडपिठाचे कामकाज होणार असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या.सुदाम देशमुख, सदस्या श्रीमती शुभांगी कोंडे, जिल्हा न्यायालयातील जेष्ठ सदस्य ऍड. रामपाल कलंत्री, ऍड. अळसपुरकर, ऍड. बाबरेकर,ऍड. बिजवे, ऍड. नंदकिशोर कलंत्री, ऍड.डॉ. रविंद्र उल्हास मराठे, श्रीमती उताणे, सुरदसे, विजय कोकाटे, हेडाऊ, रोडगे, श्रीमती मुळे, अमित मरसकोल्हे, प्रविण रोडगे, शिपाई पंडीत , मालवेकर व इतर वकील मंडळी उपस्थित होती.

Copyright ©