यवतमाळ सामाजिक

मुलगी जन्माला येतांना मुलगी म्हनुन जन्म घेत नाही. समाज तीला मुलगी बनवतो-डॉ. प्रताप परभणकर

मुलगी जन्माला येतांना मुलगी म्हनुन जन्म घेत नाही. समाज तीला मुलगी बनवतो-डॉ. प्रताप परभणकर

बळीराम पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधुन दि.२४ जानेवारी २०२२ रोजी **राष्ट्रीय बालिका दिन : एक आत्मचिंतन* * या विषयावर एक दिवसीय आँनलाईन वेबीनार दिनांक २४ जानेवारी २०२२ सोमवारी संपन्न झाले. हे वेबीनार किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातचे प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर हे होते. भाषणात बोलतांना
वेबीनार चे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शनक डॉ. प्रताप विमलबाई केशवराव अभय मल्टीस्पेशालिस्ट रूग्णालय हिमायतनगर हे होते. ते बोलतांना म्हणाले की महिला दिनाचे बीज बालिका दिनात आहे.पुढे बोलतांना म्हनाले की सर्वात म्हत्वाचे महिला दिन बालिका दिनातील फरक कळला पाहिजे. मुलगी जन्माला येतांना मुलगी म्हनुन जन्म घेत नाही. समाज तिला मुलगी बनवतो.तीला शोभेची वस्तू म्हनून बघितले जाते.आसे न करता तिला सर्व क्षेत्रात स्वातंत्र्य दिले पाहिजे. आसे ते म्हणाले.
या ववेबीनार चे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. आनंद भालेराव यांनी केले.
वेबीनार चा अध्यक्षीय समारोप उप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे यांनी केला.ते बोलतांना म्हनाले की पंढरपूर च्या मंदिरात महिला पुजारीची नियुक्ती केली आहे. शनीमंदिरात प्रवेश मिळाला आहे पण शेवटी संघर्षच करावा लागला.आसे ते म्हणाले.
या वेबीनारला यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डाँ.एस.के.बेंबरेकर उपप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील,डॉ जी.बी.लांब,प्रा.किशन मिराशे,डॉ. सुरेन्द्र शिंदे, रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने,प्रा.पुरूषोत्तम यरडलावार , डॉ योगेश सोमवंशी, प्रा.ममता जोनपेल्लीवार,ग्रंथपाल एम.एस.राठोड, डॉ. पी.डी.घोडवाडीकर, प्रा.सुलोचना जाधव ,
.डॉ रचना हिपळगावकर, मिलिंद लोकडे, काशिनाथ पिंपरे,सुधीर पाटील यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. वेबीनार ला बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.शेषराव माने यांनी केले तर आभार प्रा.सुलोचना जाधव यांनी मानले व तांत्रिक साहाय्य डॉ. योगेश सोमवंशी यांनी केले.

Copyright ©