यवतमाळ सामाजिक

विद्युतदाब वाढल्याने हीवरी येथिल अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी..

विद्युतदाब वाढल्याने हीवरी येथिल अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी..
——————————————–
लाखो रुपयांचे नुकसान, याच्या भरपाईची ग्राहकाकडून मागणी
——————————————–
यवतमाळ- या ना त्या कारणाने वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठा हा हिवरी वासियांची डोके दुःखी ठरली असतानाच दिनांक २४ जानेवारीच्या सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान अचानक विद्युतदाब वाढल्याने अनेक ग्राहकांच्या घरातील टिव्ही, रिसिवर, एल.ई.डी. बल्ब, फ्रिज, पंखे अश्या अनेक इलेक्ट्रिक वर चालणारे साहित्य निकामी होवुन यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या बाबीला सर्वस्वी जबाबदार विज वितरण कंपनीच असल्याने ग्राहकांचे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
हिवरी परिसरात नेहमीच विद्युत पुरवठा खंडित असतो. याशिवाय विज वितरणच्या विज देयकाच्या नावावर वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे रब्बी तिल शेतपिकांचे मोठे नुकसान होत असून विज खंडित करण्याचा प्रकार व अचानक विद्युत पुरवठ्याचा उच्च दाब वाढविणे त्वरित थांबवावे अशी मागणी केली जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन पिकाने दगा दिला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता विज वितरण कंपनीने विजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. तर येथील लाईन मन हि अशिक्षित असल्याने असे प्रकार सतत घडत आहे कधी पुरवठा जास्त तर कधी कमी या पूर्वीही अशीच उपकरणे निकामी झाली होती.अचानक विद्युत दाब वाढवून पुरवठा करीत आहे. त्यामुळे घरातील इलेक्ट्रिक साहित्य निकामी होवुन लाखोचे नुकसान व शेतातील गहू, हरभरा, ज्वारी, मका, भाजीपाला आधी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहे. विज वितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे ही पिके शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विजपुरवठा खंडित करू नका. सुरळीत विद्युत पुरवठा करण्यात यावा व विद्युत देयकात एकही रुपया कमी न करता देयकावर विविध अधिभाराच्या नावावर ग्राहकांची लूट करीत आहे. असे ग्राहकांचे आरोप असून अचानक विद्युत दाब वाढवून जे नुकसान उधभवले याची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा हिवरी येथिल गावकऱ्यांनी दिला आहे.

Copyright ©