यवतमाळ सामाजिक

कु.काश्यपीने वाणात केले पक्षासाठी पाणी पात्र वाटप

कु.काश्यपीने वाणात केले पक्षासाठी पाणी पात्र वाटप

यवतमाळ – येथील सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पाचव्या वर्गात शिकणारी अकरा वर्षाची कु.काश्यापी विनोद दोंदल ने आपल्या घरी होत असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आपल्या नगरातील महिलांना वाणात वाटले पक्षासाठी पाणी पात्र,
महिलांचा आनंदाचा सण मकर संक्रांत संक्रांतीच्या निमित्ताने महिला भेट सरूपात विविध प्रकारच्या वस्तू बाजारातून आणून एकमेकींना भेट सरूपात देतात, मकर संक्रांत म्हणजे वातावरणातील बदल सूर्य तीळतीळ वाढत जातो, म्हणजेच हिवाळा संपून उन्हाळाची चाहूल लागते, रखरखत्या उन्हात पशुपक्ष्यांचे पाण्यावाचून खूप हाल होतात, काही पक्षी पाण्यावाचून दगावतात सुध्दा, पशुपक्ष्यांना वाचवले पाहिजे म्हणून काही तरी प्रयत्न केले पाहिजे, हे ध्यानात ठेवून काश्यापीने आपल्या घरी होत असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पशुपक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून आपल्या घरी आलेल्या महिलांना वाणात केले पक्षासाठी पाणी पात्र वाटप,
काश्यापीने आज पर्यंत अनेक सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला, जसे पावसाळ्यात शहराच्या आजूबाजूच्या जगलात शेडबाल फेकणे, झाडांची लागवड करणे, पूरग्रस्तांन साठी मदत गोळा करणे, गरिब मुलांना कपडे वाटप, मतिमंद मुलांसोबत रक्षा बंधन करणे, गरीब लोकांना दिवाळीत फराळाचे पदार्थ वाटणे, कोरोना काळात अन्नधान्य,औषधी वाटप करणे अशी एक ना अनेक सामाजिक कार्यकरून शहरातील सर्वात लहान समाजसेविका म्हणून प्रचलित आहे,
हे कार्य करताना काश्यापीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो, चांगले कार्य केल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते, हे कार्य करताना आई कीर्ती दोंदल, आजी कमल दोंदल, भाऊ शौर्य दोंदल, वाहुल दोंदल, कोकिळा खुरद, सुनंदा लाकडे, सीमा राऊत, कांचन दोंदल, कल्पना लीचडे, शोभा चौधरी, आशा इटाळे, भाग्यश्री धकाते, स्वाती टेकाडे, रोहिणी मलूडे, स्वेता झाडे, रुचिका लीचडे, पूजा धकाते, पालवी बेंद्रे, ममता लाकडे, सुषमा बेंद्रे,सारिका राऊत संगीत टिप्रमवार, रचिता नारलावार इत्यादी अनेक महिला उपस्थित होत्या, काश्यापीला सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक समाजसेवकान कडून तसेच शाळेतील मुख्याध्यापिका मॅडम स्वाती पवार, सर दिनेश पवार व मान्यवर शिक्षक वृंदा कडून वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळते, तिच्या हया पर्यावरण पूरक कार्यामुळे शहरातील नागरिकांन कडून कौतुकाची थाप व वाहवाही होत आहे.

Copyright ©