यवतमाळ सामाजिक

अर्थसंकल्प -२०२१अनुकूल की प्रतिकूल वादविवाद स्पर्धेचा विषय कौतुकास्पद-प्रफुल्ल राठोड

अर्थसंकल्प -२०२१अनुकूल की प्रतिकूल वादविवाद स्पर्धेचा विषय कौतुकास्पद-प्रफुल्ल राठोड

किनवट वार्ता-
बळीराम पाटील कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र गणित व वाणिज्य विभागाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून किनवट शिक्षण संस्था,किनवटचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या प्रेरणेतुन व मार्गदर्शनाखाली अर्थसंकल्प-२०२१ अनुकूल की प्रतिकूल  या विषयावर आँनलाईन वादविवाद स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड हे होते.बोलतांना म्हनाले की अर्थशास्त्र विषयाच गणितीय संकल्प अनकूल की प्रतीकूल विद्यार्थ्यांच्या भाषेत मांडण्यसाठी सक्षम तयार करण्याचे कार्य विभाग करतो प्रशंसनीय आहे आसे कार्यक्रम महाविद्यालयात वेळोवेळी व्हावे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष नारायणरावजी सिडाम व प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर हे होते.प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष नारायणरावजी सिडाम यांनी कार्यक्रमाची भरभरून प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.जी.बी लांब यांनी केले.या स्पर्धेत एकूण१५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अर्थसंकल्पावर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. स्पर्धेचे परीक्षक प्रा. एम.डी.गव्हाणे व डाँ पंजाब शेरे यांनी काम पाहिले.या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर,उपप्राचार्य डॉ.गजानन वानखेडे ,संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेम्मानीवार,पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र धात्रक डॉ. जी.बी.लांब,प्रा. किशन मिराशे, रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने,प्रा.पुरूषोत्तम येरडलावार,प्रा.ममता जोनपेल्लीवार,डॉ. आनंद भालेराव,डॉ.एस. आर. शिंदे,डॉ. पी.डी.घोडवाडीकर, डॉ. लता पेंडलवाड,मंदाकिनी राठोड, प्रा. गंगाधर राऊलवाड, व महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.योगेश सोमवंशी, डॉ. पंजाब शेरे,डॉ. शुभांगी दिवे, प्रा. सुलोचना जाधव, प्रा.प्रल्हाद जाधव,प्रा.परमेश्वर भुसे यांनी मदत केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. रचणा हिपळगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. स्वाती कुरमे यांनी मानले.

Copyright ©