यवतमाळ सामाजिक

अबब.. कोरोनाच्या निर्बंधाचा फायदा घेवून अनेक भ्रष्टचारावर अधिकाऱ्याचा पडदा..,!

अबब.. कोरोनाच्या निर्बंधाचा फायदा घेवून अनेक भ्रष्टचारावर अधिकाऱ्याचा पडदा..,!
———————————————-
यवतमाळ- सार्वजनिक बांधकाम मंडळ व शासन स्तरावरील बांधकाम विभाग सध्या कमीशन खोरीच्या सावटाखाली असल्याने विकास कामाला हडताल फासून अमाप पैसा कमविण्याच्या उद्देशातून भ्रष्टाचार करीत असल्याचे पुढे आल्याने काही सामाजिक कार्यकर्ते पुढे आले असता कोरोना या महामारीचे कारण पुढे करून मुस्कटदाबी करीत असल्याचे वास्तव यवतमाळात पुढे आल्याचे आले आहे.
शासन निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळाकडून बांधकाम होने अपेक्षित आहे. मात्र यवतमाळ शाखेकडून तसे न करता भंडार शाखेकडून ई -निविदा व कोटेशन ही पद्धत न राबविता अधिकाराच्या हेकेखोर वृत्तीने स्व मलिदा लाटण्याच्या भावनेने मनमानी चालवून भ्रष्टाचार केला. याविरोधात रमेश गिरोलकर, खंडेश्वर कांबळे, अरुण कपिले, विशाल पोले यांनी वारंवार तक्रार करून हा भ्रष्टाचार पुढे यावा यासाठी प्रयत्न केला. मात्र निगरगट्ट प्रशासन याला जुमानला नसल्याने त्यांनी लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू केले. यात भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम मंडळाने दिशाभूल करणारी माहिती देवून उपोषण कर्ते व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलवण केली. व कोरोना या महामारीचे निर्बंध पुढे करून उपोषण बंद करावेत नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे दम भरण्यात येवून आपला भ्रष्टाचार लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला. यात उपोषण करत्याला तसे पत्रही प्राप्त झाले असल्याचे उपोषण करत्याचे म्हणणे आहे. यात चोर असतांनाही कोरोनाच्या नावावर शिरजोर होत असून, अधिकाराचा गलत वापर करून “उलटा चोर कोतवाल को डाटे” हा प्रत्यय पुढे येत आहे. मागील सत्तावीस दिवसापासून उपोषण सुरू असताना प्रशासन उडवाउडवीचे उत्तर देवून उपोषण कर्त्यांस वाऱ्यावर सोडून सैवधानिनिक हनन होत असल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ते क्रांती ताई राऊत (धोटे) विजया ताई धोटे, माजी आमदार, भाई अमन, गणेश भाऊ, निलेश कपिले, रवि कुथे या मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देवून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भूमरे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून घटनेची माहिती दिली. व झालेल्या भ्रष्टाचाराची सविस्तर बाबणीहाय चौकशी करावी अशी मागणी केली. व झालेल्या भ्रष्टाचाराबाबत कोरोनाचे निर्बंध पुढे करून दमदाटी करू नये असेही सांगण्यात आले. या पूर्वी प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया चे मधुकर निस्ताने यांनी कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन दिले होते. यातून त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र निगरगठ्ठ मस्तवाल अधिकाऱ्यांनी केवळ दडपण आणण्याचे प्रयत्न केले. लोकशाही मार्गाने चालणाऱ्या घटनेवर दडपशाही निर्माण केली. मात्र हे सामाजिक कार्यकर्ते या दडपशाहीला न जुमानता जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Copyright ©