यवतमाळ सामाजिक

भ्रष्टाचाराचे पारडे झाले जड,उपोषण करून हि निघेल का तोड

भ्रष्टाचाराचे पारडे झाले जड,उपोषण करून हि निघेल का तोड

सा.बां.विभाग भ्रष्टाचाराच्या विरुध्द रमेश गिरोळकर यांचे 27 दिवसाचे उपोषणानंतरही भ्रष्टाचा-यांवर कार्यवाही न करता, उपोषण कर्त्यावरच जिल्हाधिकारी यांचा कार्यवाहीचा आदेश. संतप्त “पीबीआय” कार्यकर्त्यांनी केले निदर्शने.
____________________________
यवतमाळ (.). मागील सताविस दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंडळ, अंदाज पत्रका साठी बाहेरील दर बाबतीत भंडार शाखे कडुन कोटेशन न घेता ई-निवीदा शाखे कडुन न राबविता शासन निर्णयानुसार प्रसिद्ध न करता झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करावी व इतर प्रकरणात कार्यवाही करावी या मागणीसाठी मागील 27 दिवसांपासून श्री.रमेश गिरोळकर,खंडैश्वर कांबळे,अरुण कपीले,विशाल पोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ यांनी उपोषणाचे दरम्यान दिशाभूल करणारी माहिती देवून जिल्हाधिकारी व वरिष्ठांची दिशाभूल करणार-या पत्राची प्रत उपोषण कर्त्यांना दिली. तसेच कोरोना प्रतीबंधक कायद्यांच्या नियमाचे निमित्त साधून उपोषण बंद करावे, अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र देण्यात आले.’चोर चोर मावशेरे भाई झाले आणि तेरी भी चूप मेरी चूप, असा प्रकार होत असल्याने
वरिष्ठ अधिकारी सुध्दा खुले आम भ्रष्टाचारात सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे ,एव्हढेच नाही तर अशा भ्रष्टाचारांना वाचविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उचलना-यांना उपोषण बंद करण्यासाठी दबाव आणला जात आहे.
त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे कार्यकर्ते व संघटनांमध्ये संतापाची तिव्र लाट उसळली आहे. प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया ( PBI) चे मधुकर निस्ताने यांनी कार्यकर्त्यां सह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन दिले,यात त्यांनी नमूद केले की, सामाजिक जाणीवेतून नजरेत येणारा भ्रष्टाचार बाहेर काढून शासनाची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध उपोषण करून भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी राष्ट्रीय भावनेतून शासनास वारंवार कळवूनही त्यावर कारवाई होत नाही, परंतु उपोषण कर्यांवर दडपण आणून त्यांना कायदेशीर कार्यवाही करण्याच्या धमक्या देऊन लोकशाही मार्गाचा शासनाचे अधिकारी कलंकित करीत असुन संविधानाने नागरीकांना न्याय मागण्यांच्या अधिकारावर गदा आणीत आहे.मधुकर निस्ताने यांनी भ्रष्टाचा-यावर कडक कारवाई करावी व उपोषण कर्त्यांना न्याय मिळेस्तोवर सुरक्षा द्यावी, अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अरुन कपीले, मोहन पवार, संदिप मेश्राम, पांडरंग किरणापुरे,, कृष्णा टेकाम सह रमेश गिरोलकर , खंडेश्वर कांबळे, विशाल पोले यांचा सहभाग होता.

Copyright ©