यवतमाळ सामाजिक

महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डॉ. प्रिती तोटावार यांची निवड

महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डॉ. प्रिती तोटावार यांची निवड

पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि जनजागृतीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन डॉ. प्रिती तोटावार यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
डॉ. प्रिती तोटावार ह्या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमध्ये उत्कृष्टरीत्या कार्य करीत असून मागील काही वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक कार्यात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे याकरीता त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यापैकी विदर्भभूषण पुरस्कार , कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार, समाज वैभव पुरस्कार, समाजप्रबोधन साहित्य पुरस्कार ,शिक्षणरत्न पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. प्रिती तोटावार यांचे पर्यावरण क्षेत्रात व्यापक कार्य सुरू असून त्यांचे पर्यावरणविषयक विविध संशोधनपर लेख प्रकाशित झालेलेआहेत.मार्गदर्शन शिबिरे व व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांचे लोकजागृतीचे कार्य सुरू आहे.शेतकऱ्यांना पक्षीसंवर्धनाचे महत्व कळावे याकरिता त्यांची पर्यावरण आणि शेतकरीमित्र ही माहीती पुस्तिका प्रकाशित झाली आहे.विविध अभियान व कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांनी समाजाला मौलिक संदेश दिला आहे.
डॉ. प्रिती तोटावार यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेतील पदाधिकारी व सदस्यांद्वारे उत्कृष्ट उपक्रम राबविले जात असून त्याद्वारे समाजात पर्यावरणविषयक जनजागृती निर्माण होण्यास मदत होत आहे.
त्यांनी पर्यावरण क्षेत्रामध्ये केलेल्या या विशेष कार्याची दखल घेऊन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वरिष्ठ कार्यकारिणीतील अधिकृत समितीतील राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष दीपक भवर,सचिव सचिन वाघ,सल्लागार लताश्री वडनेरे,राजेंद्र नागोडे, हरिविजय देशमुख यांच्याद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेफडोच्या समस्त कार्यकारीनीद्वारे व समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Copyright ©