यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथील ग्रामपंचायत सचिव सतत गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष

 

सावळी सदोबा प्रतिनिधी आशिफ खान

सावळी सदोबा येथील ग्रामपंचायत सचिव सतत गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष

(गटविकास अधिकारी यांचे सावळी सदोबा येथील तक्रारीचकडे दुर्लक्ष)
सावळी सदोबा:-आर्णी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सावळी सदोबा ग्रामपंचायत,या ग्रामपंचायतीचे ग्रामसचिव अधिकारी गुजर हे मागील अनेक दिवसापासून सतत गैरहजर राहत असल्याने,गावातील नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांमध्ये ग्रामसचिवायाबद्दल असंतोष निर्माण झाला आहे, ग्रामपंचायत सचिव गैरहजर राहत असल्याने सावळी सदोबा येथील विकास कामे सुध्दा बऱ्याच प्रमाणात खोळंबली आहे,त्यामुळे सावळी सदोबा येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी दिनांक ११/१/२०२२ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्णी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून,आजपावेतो दिलेल्या तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे आर्णी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी ग्रामसचिव गुजर यांना पाठीशी घालत तर नाही ना अशी चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे,२६ जानेवारी गणराज्यदिनापर्यंत नवीन ग्रामविकास अधिकारी न दिल्यास ग्रामपंचायत सावळी सदोबा यांच्याकडून व समप्त नागरिकांकडून ग्रामपंचायतीला ताळे ठोकून ग्रामपंचायतीची चावी गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्णी यांच्याकडे सोपवण्यात येईल,आज रोजी होत असलेल्या नागरिकांच्या गैरसोयीला पंचायत समिती आर्णीचे विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी पूर्णपणे जबाबदार राहतील अशा प्रतिक्रिया सावळी सदोबा ग्रामस्थांमध्ये चालू आहेत

Copyright ©