महाराष्ट्र यवतमाळ सामाजिक

श्रीरेणूकादेवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. कॉं.गंगाधर गायकवाड

 माहूर प्रतिनिधी पद्मा गि-हे

श्रीरेणूकादेवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. कॉं.गंगाधर गायकवाड.

27 जानेवारी 2019ते31 जानेवारी 2019 या कालावधीत वेतनवाढीच्या प्रमूख मागणीसह विविध मागण्या मंजूर करण्यात याव्या यासाठी सिटूसलग्न मजदूर संघ जिल्हा नांदेडच्या अधिपत्याखाली श्रीरेणूकादेवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी लोकशाही मार्गाने उपोषण व आंदोलन केले होते .त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव अभिनव गोयल यांनी संघटनेच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याचे लेखी आश्वासन दिले होते.त्याबाबत विश्वस्त मंडळाने ठराव देखील पारीत केला.असे असतांना दोन वर्षाचा प्रदीर्घ कालावधीनंतरही मंदीर प्रशासनातर्फे ठरावाची अमलबजावणी करण्यात आली नसल्याने विश्वस्त समितीचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटनेने दिनांक 10 जानेवारी 2022रोजी श्रीरेणूकामातेच्या पायथ्याशी महाआरती करून सत्याग्रह सूरू केला असून 13 दिवस होऊनसुद्धा मंदिर प्रशासनाने आमच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला असून मंदीर प्रशासननाने आमचा अंत न पाहता सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या मान्य कराव्या आमच्या मागण्या मान्य न केल्यास 25 जानेवारी 2022 पासून जिल्हा , राज्य स्तरीय प्रमुख पदाधिकारी यांचेसह सुमारे पाचशे कार्यकर्ते तहसील कार्यालय माहूर समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

Copyright ©