यवतमाळ सामाजिक

लहूजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध

लहूजी शक्ती सेनेच्या वतीने
मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध

न्याय मिळण्यासाठी विविध मागण्यांचे तहसिलदार यांना निवेदन

महाराष्ट्रात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराचा निषेध व्यक्त करुन शोषित, पिडीत मागासवर्गीयांना न्याय व संरक्षण देण्यासह विविध मागण्यांचे निवेदन लहूजी शक्ती सेनेच्या वतीने सुभाष जाधव तहसिलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांना देण्यात आले. यावेळी लहूजी शक्ती सेनेचे प्रमोद लोंढे युवक जिल्हाध्यक्ष.धिरज इंगोले शहराध्यक्ष.कैलास साबळे तालुका प्रशिध्दी प्रमुख.प्रकाश तांबे तालुकाअध्यक्ष. रंजितभाऊ झोंबाडे गजानन साबळे आदी उपस्थित होते. महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नांव वगळून त्यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरणार्‍या भारत सरकार अंतर्गत सामाजिक न्याय विभागाचे संचालक विकास त्रिवेदी याचे निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
भारत सरकार अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या संस्थेमार्फत राज्यातील महापुरुष, प्रबोधनकार व प्रतिष्ठित व्यक्तीची नांवे यादीत समाविष्ट आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव या यादीत घेणे गरजेचे असताना फाऊंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा प्रस्ताव नाकारला आहे. ते प्रतिष्ठित नव्हते असे, नमूद करुन त्रिवेदी यांनी अकलेचे तारे तोडण्याचे काम केले. त्रिवेदी यांनी अण्णाभाऊंच्या कार्याचा व देशातील उपेक्षित घटकाचा अपमान केला आहे. तसेच महाराष्ट्रात मातंग समाजावर अन्याय, अत्याचार वाढत असून, याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. तर या वंचित घटकांना न्याय मिळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नांव वगळून त्यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरणार्‍या विकास त्रिवेदी याच्यावर गुन्हे दाखल करून.त्याचे निलंबन व्हावे.अमरावती प्रशासनाने हटवलेले छत्रपती शिवाजी महाराज व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे याचा पुतळा तात्काळ बसवावा.यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील वैदयकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या खुनाचा तपास वेगाने करून सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा.श्रीगोंदा (जि.अहमदनगर) येथील मोजे राजापूरमाट येथील जातीवादी वीटभट्टी मालकाच्या यांच्या खोट्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस निरीक्षक व बिट अमंलदार यांनी मातंग समाजाच्या दोन तरूणावर खोटे गुन्हे दाखल करून जबर मारहाण केली असून संबंधितांवर कारवाई गुन्हे दाखल करून मातंग समाजाच्या तरूणावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी दारव्हा तालुका लहुजी शक्ती सेनेचे वतीने निवेदन देण्यात आले.

Copyright ©