महाराष्ट्र यवतमाळ सामाजिक

उत्तरप्रदेश विधानसभा निरीक्षकपदी प्रा. डॉ. मिनाक्षी सावळकर

उत्तरप्रदेश विधानसभा निरीक्षकपदी प्रा. डॉ. मिनाक्षी सावळकर

राज्य समन्वयक प्रदेश काँग्रेस कमिटी असंघटित कामगार महिला बचत गट व राहुल गांधी विचार मंच चे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. मिनाक्षी सावळकर यांची उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकनिमित्त निरीक्षकपदी निवड झाली आहे. अखिल भारतीय महिला प्रदेशच्या अध्यक्षा निता डीसूझा यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर केली.
पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने ५० टक्के महिलांना स्थान देण्याच्या निमित्ताने ही निवड प्रक्रीया जाहीर करण्यात आली. त्यात राज्य समन्वयक प्रदेश काँग्रेस कमिटी असंघटित कामगार महिला बचत गट ,व राहून गांधी विचार मंचच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. मिनाक्षी सावळकर यांचाही समावेश आहे. उत्तरप्रदेशातील आजमगड येथील विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसच्या निरीक्षक म्हणून त्यांची पक्ष श्रेष्टींनी निवड केली. त्या आपल्या निवडीचे श्रेय काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी, खा. राहूल गांधी, प्रियांका गांधी, अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नेताजी डिसूजा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्टÑाचे प्रभारी वेणू गोपाल, पाटील त्याच प्रमाणे राज्यातील मंत्री अशोक चव्हाण, विजय वडट्टीवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, बाळासाहेब मांगुळकर जि प उपाध्यक्ष देवानंद पवार प्रा. वसंत पूरके . जावेद अंसारी तातू भाऊ देशमुख सचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी श्री रामभाऊ देवसरकर सभापती बांधकाम जिल्हा परिषद नितीनजी माहेशवरी गोपाल अग्रवाल यांना देण्यात येत आहे असे अभिलाष कोरडे यांनी कळविले आहे

Copyright ©