Breaking News यवतमाळ सामाजिक

खा.राजे संभाजी शाहू छत्रपती यांनी श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड येथील कर्मचाऱ्यांना दिला धीर !

माहुर प्रतिनिधी पदमा गिऱ्हे

खा.राजे संभाजी शाहू छत्रपती यांनी
श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड येथील कर्मचाऱ्यांना दिला धीर !
(सत्याग्रहाचा ७ वा दिवस;संस्थान प्रशासनाने अद्याप घेतली नाही दखल)

माता रेणुकेच्या पहिल्या पायरी जवळ दि.१० जानेवारी पासून संस्थानातील ७० कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह सुरू केला आहे.
मागील चार वर्षापासून श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड येथे सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनची रितसर शाखा कार्यान्वित आहे.
दोनवर्षापूर्वी २७ ते ३१ जानेवारी असे पाच दिवस संस्थानातील कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह केला होता. तेव्हा संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट श्री अभिनव गोयल (भा.प्र.से.) यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड व स्थानिक समितीचे अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव यांच्या नावाने दिले होते व तेव्हा सत्याग्रह थांबविण्यात आला होता.परंतु दोन वर्षे होऊन गेले तरी मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे
सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड व श्री रेणुका देवी स्थानचे युनियनचे स्थानिक अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव आणि सचिव कॉ.अरुण घोडेकर यांच्या नेतृत्वाखाली दि. १० जानेवारी पासून पुन्हा माहूर गडावर रेणुका मातेच्या पायथ्याशी सत्याग्रह सुरू केला आहे.
सात दिवसा पासून अखंड चालणाऱ्या सत्याग्रहास अनेक संघटनांनी पाठिंबा दिला असून मातेच्या दर्शनासाठी येणारे काही पत्रकार बांधव तथा भाविक आंदोलनाच्या मंडपातील चित्रिकरण करून बातम्या प्रसारीत करीत आहेत. दि.१६ जानेवारी रोजी खासदार राजे संभाजी शाहू छत्रपती यांचा रेणुका माता दर्शन दौरा नियोजित असल्यामुळे त्यांनी गडावर येऊन रेणुका मातेचे दर्शन घेतले व सीटूचे आंदोलन सुरू असलेल्या मंडपात येऊन आंदोलनातील कर्मचाऱ्यांना धीर दिला. तसेच मी तात्काळ सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट तथा संस्थानचे सचिव श्री किर्तीकिरण पुजार यांच्याशी बोलून तुमचा प्रश्न मांडतो असे खासदार राजे म्हणाले.
गड किल्ल्याची पहाणी व दर्शनासाठी आलेल्या राजेंनी तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धीर दिला परंतु श्री रेणुका देवी संस्थानच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सत्याग्रहाची दखल अद्याप घेतली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय संताप व्यक्त करीत आहेत.
श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड येथील अध्यक्ष हे जिल्हा सत्र न्यायालयाचे मा.मुख्य न्यायमूर्ती आहेत आणि सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (भा.प्र.से.) अधिकारी असल्यामुळे लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणीवर कायम नियुक्ती पत्र देण्यात येतील असा विश्वास सीटू संलग्न मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांना आहे.
तत्कालीन सचिवांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाल्या शिवाय सत्याग्रह संपणार नाही अशी भूमिका अनेक वर्षापासून कर्तव्य बजावणा-या कर्मचाऱ्यांची आहे.
दि.१६ फेब्रुवारी २०२० रोजीच्या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांना पूर्व लक्षी प्रभावाने नियमित वेतन श्रेणीवर कायम स्वरूपी नियुक्ती पत्र देण्याचे मान्य केले आहे.
अत्यंत तुटपुंज्या पगारावर मागील अनेक वर्षापासून चोख कर्तव्य बजावणा-या कर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या मागण्या व माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे.तसेच दिनांक ०६/०२/२०२१ व दि.०५/०६/२०२१ रोजी विश्वस्त समितीच्या बैठकीतील मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी करून दि.१ फेब्रुवारी २०२१ पासून वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा. तसेच रिक्त असलेले व्यवस्थापक व सुरक्षा अधिकारी यांची पदे तात्काळ भरण्यात यावेत. या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.सदरील सत्याग्रहामध्ये युनियन अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड,स्थानिक समिती अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव,सचिव कॉ.अरुण घोडेकर,उपाध्यक्ष कॉ.अरविंद राठोड,सहसचिव कॉ.गजानन घूगे,कॉ.आकाश वानखेडे,कोष्याध्यक्ष कॉ.विनोद कदम यांच्या सह श्री रेणुका देवी संस्थानचे सर्व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडून सत्याग्रहात सहभागी होतआहेत.

—————————————

Copyright ©