यवतमाळ सामाजिक

लाडखेड पो. स्टे. हद्दीतील पांढुर्णा येथिल दोघे पाच तालुक्यातून तडीपार 

 लाडखेड पप्रतिनिधी वसंत जांभोरे

लाडखेड पो. स्टे. हद्दीतील पांढुर्णा येथिल दोघे पाच तालुक्यातून तडीपार 
—————————————-

यवतमाळ- लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पांढुर्णा येथे राहणारे सुनील कोमल राठोड वय २९ वर्ष व रामपरेश दादाराव राठोड वय २८ वर्ष यांच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना सहा महिन्यांसाठी पाच तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.
लाडखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पांढुर्णा येथील हे दोघे रहिवाशी यांचेवर अनेक चोरीचे गुन्हे असल्याच्या कारणावरून त्यांचे हद्दपारीच्या प्रस्ताव मंजुरीकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. यानुसार सुनील राठोड व रामपरेश राठोड यांना दारव्हा, दिग्रस, नेर, यवतमाळ, आर्णी या पाच तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.१४ जानेवारी पासून सहा महिन्यांपर्यंत त्यांना या परिसरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धरणे,उपविभागीय पोलिस अधिकारी मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, रामकृष्ण भाकडे पोलीस नायक वंशपाल इंगोले, अनिल सुरपाम, योगेश नागदिवे यांनी पार पाडली.

Copyright ©