महाराष्ट्र यवतमाळ सामाजिक

मकर संक्रांतीच्या निमित्ताने आई रेणूकेमातेला चढविला हलवण्याच्या दागिन्यांचा साज.

माहूर प्रतिनिधी पद्मा गिऱ्हे

मकर संक्रांतीच्या निमित्ताने आई रेणूकेमातेला चढविला हलवण्याच्या दागिन्यांचा साज.

हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या पारंपारिक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यादिवशी सौभाग्यवती महिला एकमेकींना हळदी कुंकू लावून अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी सौभाग्याच वान देतात तसेच दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून माहूर गडावर हजारोंच्या संख्येने महिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने श्रीरेणूकामातेला साडीचोळी, ओटी, तिळगूळ, हलव्याचे दागिने अर्पण करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आईच्या चरणी साकडे घालीत आसतात परंतू कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्याने भाविक महिलांना गडावर येता आले नाही .मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर संस्कार भारतीतर्फे यांनी श्रीरेणूकामातेला तिळगूळ, हलव्यापासून बनविलेले सौभाग्याच लेन मंगळसूत्र, मोहनमाळ, कर्णफूल, कमरपट्टा, नथ, ईत्यादी अलंकार अर्पण केले संस्थानचे विश्वस्त तथा मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी, दूर्गादास भोपी, आशिष जोशी संजय काण्णव, अरविंद दैव, चंद्रकांत रीठे यांच्या हस्ते मातेला अभिषेक , भरजरी शालू, व हलव्याचे दागिने चढवून महापूजा , महानेवेद्य महाआरती करण्यात आली. यानंतर परशुरामाचे पूजन करून पंचांग वाचन करण्यात आले.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असून याच दिवशी उत्तरायणाची सुरवात होते.यादिवशी पूण्यक्षेत्री तिर्थस्नान, दानधर्म,संत महंत,प्रुथ्वी,व देवता। पूजनाने विशेष पुण्य फळ प्राप्त होत असल्याने धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी होत असते.
आयुर्वेदात तीळ गूळ हे पदार्थ उष्ण असून तिळगूळाचे एकत्रित मिश्रण तयार करून ते सेवन केल्याने कफ, पित्त ईत्यादी आजार दूर होऊन उत्तम आरोग्य प्राप्त होते अशी वदंता आहे,संस्कार भारतिच्या प्रमुख कार्यकर्त्या सौ. शितल निलेश केदार.स्वाती आडे, स्मिता केदार, अजय पुजारी यांनी तिळगूळ, हलव्यापासून अथक परिश्रम घेऊन आकर्षक दागिने बनविले होते .

Copyright ©