यवतमाळ सामाजिक

महापुरुषांच्या विचारांची आचरणात गरज – राजू निकोडे

महापुरुषांच्या विचारांची आचरणात गरज – राजू निकोडे
——————————————–
घाटंजी-जो पुरुष लोकांच्या कल्याणासाठी, हितासाठी, भल्यासाठी आपलं जीवन अर्पित करतो तो म्हणजे पृथ्वीतलावरील देव आहे. असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात म्हणून बहुजन समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे महापुरुष म्हणजे खरे खुरे देव आहे. त्यामुळे त्यांच्या आदर्शाचे पालन करणे आपले आद्य कर्तव्य ठरते. त्यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून आपण वाचले पाहिजेत तेच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल,
व ते विचार आपल्या आचरणात आणण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन समता पर्व प्रतिष्ठान घाटंजी तालुक्याचे अध्यक्ष राजूभाऊ निकोडे यांनी केले. ते सायतखर्डा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सायतखर्डा येथील सरपंच कैलास मुनेश्वर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिताराम शेंडे होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वर्षा कनाके ( सरपंच चिखलवर्धा), योगिता कुळसंगे (सरपंच तरोडा), मेश्राम बाई (सरपंच पंगडी), वंदना नगराळे (सरपंच बेलोरा), सतीश गड्डमवार (सरपंच कुर्ली) चंद्रकांत वेट्टी (सरपंच सायफळ), उमेश घोडाम (सरपंच माणूसधरी), अजय कोवे, नरगुलवार (उपसरपंच ), काशिनाथ वावरे, अजय गजभिये, देविदास निकोडे, आनंदराव लेनगुरे, दर्शन सोनुले, सुभाष गंगशेट्टीवार, गजानन गुरनुले, सुधीर गुरनुले, प्रमोद बोंद्रे, निल चौधरी व रवि वाढई आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच कैलास मुनेश्वर, संचलन गजानन ठाकरे तर आभार अशोक मोहुर्ले यांनी मानले.

Copyright ©