Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात किती आहे कोरोणाबाधित ;किती आहे कोरोनामुक्त पहा सविस्त

गेल्या 24 तासात किती आहे कोरोणाबाधित ;किती आहे कोरोनामुक्त पहा सविस्त

 

यवतमाळ दि. 15 जानेवारी : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 121 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 37 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 533 व बाहेर जिल्ह्यात 30 अशी एकूण 563 झाली असून त्यातील 59 रूग्ण रूग्णालयात तर 504 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1583 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 121 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1462 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73698 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71347 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 121 रूग्णांमध्ये 38 महिला व 83 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात आठ, दारव्हा पाच, दिग्रस चार, कळंब तीन, नेर 10, पांढरकवडा एक, पुसद नऊ, राळेगाव 12, वणी सहा, यवतमाळ येथील 52, झरीजामणी दोन व इतर जिल्ह्यातील नऊ रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लक्ष एक हजार 165 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 27 हजार 398 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.20 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 7.64 आहे तर मृत्यूदर 2.43 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1706 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 63 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1706 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 61 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 726 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड उपयोगात असून 753 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©