यवतमाळ राजकीय

प्रमोद उर्फ वसंता लोंढे यांची युवक काँग्रेस दिग्रस विधानसभा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

प्रमोद उर्फ वसंता लोंढे यांची
युवक काँग्रेस दिग्रस विधानसभा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
———————————–
किन्ही(वळगी)
सर्वाचे परिचयाचे मातंग समाजाचे तरुण तडफदार युवा नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते. वार्ताहर. प्रत्येकाच्या सुखा दुःखा मध्ये मदत करणारे पंचायत समिती. जिल्हा परिषद. दवाखाना. बॅक. तहसिल. पोलिस स्टेशन. कोणत्याही काम व अडचणीत आवाज दिला की एका हाकेला आवाज देणारे.तळागाळातील सर्व सामान्यांशी मैत्री ची नाळ.जोडणारेआणि प्रत्येकासी नेहमी लहान मोठ्या ला सन्मानाची वागणूक देणारे. *लहुजी शक्ती सेना युवक जिल्हाध्यक्ष* तथा सामाजिक कार्यकर्ते *प्रमोद उर्फ वसंता लोंढे* यांची नुकतीच श्री मा.माणिकराव ठाकरे साहेब माजी विधान परिषद उपसभापती यांच्या आदेशानुसार श्री राहुलभाऊ ठाकरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ.प्रकाश नवरंगे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी.अतुल राऊत जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस. नंदराज ठाकरे दिग्रस विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 11/1/2022 दारव्हा येथे *प्रमोदभाऊ लोंढे* यांची *युवक काँग्रेस दिग्रस विधानसभा उपाध्यक्ष* पदी नियुक्ती करण्यात आली प्रमोद लोंढे याचे वडील केशवरावजी लोंढे समाजातील एक ज्येष्ठनेते असुन काँग्रेस पक्षाचे पंचायत समिती सदस्य दारव्हा व किन्ही वळगी चे माजी पोलीस पाटील पदही भुषविले वडीलांच्या वारसा चालवित प्रमोद लोंढे नी सुध्दा सामाजिक राजकीय कार्यात मोठी आवड असुन ते तालुका व जिल्हास्तरावर अण्णाभाऊ साठे जयंत्या सामाजिक उपक्रम राबवितात रक्तदान शिबीर व समाज संघटनेचे सुध्दा काम करतात हे कार्य पाहता युवा नेते राहुल ठाकरे यांनी कार्याची दखल घेऊन एक सामान्य कार्यकर्त्यांना युवक काँग्रेस दिग्रस विधानसभा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
प्रमोद लोंढे यांना विचारणा केली असता त्यांनी आदरणीय लोक नेते माणिकराव ठाकरे व राहुल ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाची माझ्या वर जबाबदारी दिली. ते मि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जोमाने काम करील पक्षाची नाळ समाजासी जोडेल महात्मा गांधी यांच्या विचारांचे सर्व समभाव म्हणुन काय करेल. संघटन व काँग्रेसचे ध्येय धोरण लोकां पर्यंत पोहचविण्याचे कार्य मि करणार काँग्रेस पक्षानी दिलीली जबाबदारी यशस्वीपणे काम करील असे प्रमोद लोंढे यांनी म्हटले युवक काँग्रेस नियुक्ती कार्यक्रमला रामधन जाधव सेवादल काँग्रेस तालुका अध्यक्ष. मनमोहनसिंग चव्हाण माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद.गणेशभाऊ म्हातारमारे.राजुभाऊ लाड.गुलाबराव राठोड.कदमकाका.अतुल राऊत अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस. गुड्डु जवादे.आजी माजी युवक काँग्रेसचे प्रविण जाधव निलेश बोरकर जमन काझी अरुन नांदेकर कैलास साबळे विकास काळे चंदु बिबेकर जय सिंहे सतिश बागल नरेंद्र गघाने पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©