यवतमाळ सामाजिक

चालबर्डी ग्रा पं. मध्ये ग्रामसेवक मंगेश गाऊत्रे यांना निरोप व सत्कार समारंभाचा कार्यक्रम

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

चालबर्डी ग्रा पं. मध्ये ग्रामसेवक मंगेश गाऊत्रे यांना निरोप व सत्कार समारंभाचा कार्यक्रम
——————————————–
घाटंजी-पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चालबर्डी ग्राम पंचायत येथून उत्कृष्ट कार्य बजावणारे असे परिचित असणारे ग्रामसेवक मंगेशजी गाऊत्रे यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम ग्राम पंचायत आणि वाचनालया तर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अमर ‍अण्णा पाटील होते. तर विचारपीठावर सरपंचा नंदाताई कोडापे उपसरपंच यांचे प्रतिनिधी श्री. प्रेम भाऊ तिरमनवार,श्री. तुकाराम नेहारे,नवनियुक्त ग्रामसेवक हंसराजजी मेश्राम साहेब ग्राम पंचायतमधील सर्व सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ग्रामसेवक मंगेशजी गाऊत्रे साहेबांचा सत्कार श्री.अमर अण्णा पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गाऊत्रे यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्यावर खुश होतो असे गौरवद्गगार काढले. याक्षणी भावनिक झालेले ग्रामसेवक मंगेश गाऊत्रे यांनी मी दिलेल्या सेवेला आपला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आपण मला केलेल्या सहकार्याबद्दल मी ऋणी असून आज जो मला सन्मान देवून सत्कार केला याबद्दल आयोजकांचे आणि गावकऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. किशोर अगुवार यांनी केले. तर चालबर्डी येथील पोलिस पाटील श्री शुद्धोधन मोडक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी व वाचनालयातील सदस्य आणि गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

Copyright ©