यवतमाळ सामाजिक

अनाथाच्या आईस नाका पार्डी येथे श्रद्धांजली

अनाथाच्या आईस नाका पार्डी येथे श्रद्धांजली

नाका पार्डी येथे हनुमान मंदीर सभागृहात, शिंदूताई सपकाळ, यांचा श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमात डॉ. अनंत सुर्यकार यांनी माई बद्दल माहिती दिली, तसेच अँड विजय नंदकिशोर गुप्ता, यांनी मार्गदर्शन केले ते बोलले स्वतः साठी तर जगतोच पण दुसऱ्यासाठी सुध्दा आपण जगावे, समाजासाठी काही तरी केलं पाहिजे हे माई आपणा सर्वांना संदेश देऊन गेल्या आणि आपण माईच्या संदेशाचे अनुकरण केल्यास तेव्हाच खरी माई ला श्रद्धांजली अर्पण होईल . या कार्यक्रमाला अमोलकचंद कॉलेज चे.डॉ. अनंत सूर्यकार, डॉ. श्रीमती वानखेडे , डॉ. अग्निहोत्री . एन एस एस चे विद्यार्थी, विद्यार्थिनी, सरपंच प्रेम धुर्वे, उपसरपंच प्रतीक्षा भवरे, ग्रामपंचायत सदस्य कु. शीतल गुप्ता. रेखा राऊत, गौकर्णा मेश्राम, नलिनी मडावी, सतीश राऊत, पोलीस पाटील बोरखडे, माझी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गुप्ता, पंकज तिवारी, शंकर सोनवणे, निलेश नगोशे, दिनकर भवरे, भानुदास भवरे, विजय सोनवणे, संदीप नेवारे, इतर नागरिक उपस्थीत होते.

Copyright ©