Breaking News यवतमाळ सामाजिक

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 तासात 42 जण कोरोना पॉझिटिव्ह ; 5 जण कोरोनामुक्त

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 तासात 42 जण कोरोना पॉझिटिव्ह ; 5 जण कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1742 बेड उपलब्ध

ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 183

यवतमाळ दि. 09 जानेवारी :
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 42 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 168 व बाहेर जिल्ह्यात 15 अशी एकूण 183 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1104 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 42 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1062 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73175 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71204 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 42 रूग्णांमध्ये 10 महिला व 32 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील दोन, दिग्रस दोन, घाटंजी तीन, नेर पाच, पांढरकवडा एक, पुसद 12, राळेगाव तीन, उमरखेड एक, यवतमाळ येथील 10 व इतर जिल्ह्यातील तीन रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 93 हजार 958 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 20 हजार 724 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.22 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 3.80 आहे तर मृत्यूदर 2.44 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1742 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 27 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1742 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 27 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 760 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©