यवतमाळ सामाजिक

झरी तालुक्यात कॅच द रेन निमित्ताने युवकांना दिला संदेश

झरी तालुक्यात कॅच द रेन निमित्ताने युवकांना दिला संदेश

जलसंधारणासाठी विविध माध्यमातून जनजागृती

पाण्याला जीवन असे म्हणतात. मानवाला जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे.
रोजच्या दैनंदिन वापरासाठी भरपूर प्रमाणात पाणी खर्च होते. भूगर्भात पाण्याचे साठे मर्यादित आहे . उपसाचे प्रमाण वाढविल्यास ते संपतात. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पाणी जपून वापरणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, जल संवर्धन करणे गरजेचे आहे.
जमिनीतील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी वृक्षारोपणाप्रमाणेच वनराई बंधारा बांधणे, पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे इत्यादी गोष्टी महत्वाच्या ठरतात.
यासाठी प्रत्येकाला पाण्याचे महत्व समजायला पाहिजे. पाण्याचे महत्व जाणून कृती घडावी, यासाठी नेहरू युवा केंद्रामार्फत कॅच द रेन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
नेहरू युवा केंद्र यवतमाळ तसेच रक्तविर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तालुक्यात कॅच द रेन चा संदेश गावागावात पोहोचविला जात आहे. यासाठी प्रफुल भोयर, प्रियल पथाडे, गणेश पिंपळशेंडे, अश्विन रुयारकर, स्वयंसेविका प्रविणा भोयर हे मेहनत घेत आहे.

Copyright ©