यवतमाळ सामाजिक

दि.६जानेवारी गुरुवार- हिवरी, यवतमाळ येथील जेतवन बुद्ध विहारात अमेरिकन भिक्षुणी शासनदीपिका माताजी खांति खेमा यांच्या मार्गदर्शनात मैत्री विपश्यना शिबिरास आरंभ झाला

 

जेतवन बुद्ध विहारात अमेरिकन भिक्षुणी शासनदीपिका माताजी खांति खेमा यांच्या मार्गदर्शनात मैत्री विपश्यना शिबिरास आरंभ झाले

दि.६जानेवारी गुरुवार- हिवरी, यवतमाळ येथील जेतवन बुद्ध विहारात अमेरिकन भिक्षुणी शासनदीपिका माताजी खांति खेमा यांच्या मार्गदर्शनात मैत्री विपश्यना शिबिरास आरंभ झाला आहे. या शिबिरात दहा दिवस धम्म म्हणजे काय, भगवान बुद्धांची मूळ शिकवण नेमकी काय आहे, योग्य प्रकारे ध्यान कसे करावे याचे मार्गदर्शन केले जाईल. माताजी म्हणाल्या की त्या भारतीय बुद्धानुयायी साधकांना जगातील उत्तम बुद्धानुयायी साधक बनलेले पाहू इच्छितात. सहा पायर्यांचा सम्यक व्यायामः-१.चित्त भटकलेले ओळखणे.२.भटकवणार्या विचारांपासून मन काढून घेणे. ३.शरीरातील विशेषतः डोक्यातील ताणतणाव ढीला करणे ४.स्मितहास्य करणे ५.ध्यानाच्या आलंबनाकडे परतणे.६.ध्यान चालू ठेवणे. ताणतणाव ढीला करणे व चेहऱ्यावर सतत स्मितहास्य ठेवणे हे ध्यानातील प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहे. कुणावरही अगदी तथागतावर सुद्धा अंधविश्वास ठेवू नका असे तथागतांनीच स्वतः काळाम सूत्रांत साःगितले आहे. स्वतःला अनुभव आल्यानंतरच विश्वास ठेवा. शिबिरात महाराष्ट्रातील विविध भागातून एकूण वीस साधक साधिका भाग घेत आहेत. हे शिबीर सर्व जातिधर्मांसाठी खुले आहे. अमरावतीचे निर्मलपुत्र भदन्त आनंद हेसुद्धा शिबिरात भाग घेत आहेत. श्रीलंकेहून आलेले आदरणीय भिक्षु धम्मगवेसी थेरो हे माताजींना हिंदी अनुवादात मदत करत आहेत. यच प्रकारचे दुसरे शिबीर २० ते ३० जानेवारी होणार आहे. त्यासाठी नोंदणीची लिंक https://tinyurl.com/Jetvan20Jan अशी आहे. जेतवन बुद्धविहार हे यवतमाळजवळ हिवरी येथे स्थित असून श्री.रमेश बनसोडे यांचे अध्यक्ष तेखाली श्री गौतम बनसोड व पूर्ण बनसोड परिवार तथागत व डाॕ आंबेडकर यांनी मानवतेला दाखवलेला मार्ग सर्व जातिधर्माच्या माणसांना मिळावा यासाठी भरपूर परिश्रम घेत आहेत. शासनदीपिका माताजी खांति खेमा यांच्या मार्गदर्शनात मैत्री विपश्यना शिबिरास आरंभ झाला आहे. या शिबिरात दहा दिवस धम्म म्हणजे काय, भगवान बुद्धांची मूळ शिकवण नेमकी काय आहे, योग्य प्रकारे ध्यान कसे करावे याचे मार्गदर्शन केले जाईल. माताजी म्हणाल्या की त्या भारतीय बुद्धानुयायी साधकांना जगातील उत्तम बुद्धानुयायी साधक बनलेले पाहू इच्छितात. सहा पायर्यांचा सम्यक व्यायामः-१.चित्त भटकलेले ओळखणे.२.भटकवणार्या विचारांपासून मन काढून घेणे. ३.शरीरातील विशेषतः डोक्यातील ताणतणाव ढीला करणे ४.स्मितहास्य करणे ५.ध्यानाच्या आलंबनाकडे परतणे.६.ध्यान चालू ठेवणे. ताणतणाव ढीला करणे व चेहऱ्यावर सतत स्मितहास्य ठेवणे हे ध्यानातील प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहे. कुणावरही अगदी तथागतावर सुद्धा अंधविश्वास ठेवू नका असे तथागतांनीच स्वतः काळाम सूत्रांत साःगितले आहे. स्वतःला अनुभव आल्यानंतरच विश्वास ठेवा. शिबिरात महाराष्ट्रातील विविध भागातून एकूण वीस साधक साधिका भाग घेत आहेत. हे शिबीर सर्व जातिधर्मांसाठी खुले आहे. अमरावतीचे निर्मलपुत्र भदन्त आनंद हेसुद्धा शिबिरात भाग घेत आहेत. श्रीलंकेहून आलेले आदरणीय भिक्षु धम्मगवेसी थेरो हे माताजींना हिंदी अनुवादात मदत करत आहेत. यच प्रकारचे दुसरे शिबीर २० ते ३० जानेवारी होणार आहे. त्यासाठी नोंदणीची लिंक https://tinyurl.com/Jetvan20Jan अशी आहे. जेतवन बुद्धविहार हे यवतमाळजवळ हिवरी येथे स्थित असून श्री.रमेश बनसोडे यांचे अध्यक्ष तेखाली श्री गौतम बनसोड व पूर्ण बनसोड परिवार तथागत व डाॕ आंबेडकर यांनी मानवतेला दाखवलेला मार्ग सर्व जातिधर्माच्या माणसांना मिळावा यासाठी भरपूर परिश्रम घेत आहेत.

Copyright ©