यवतमाळ सामाजिक

3 जानेवारी एवजी 5 जानेवारीला होणार आशा व गटप्रवर्तकांचा मोर्चा

3 जानेवारी एवजी 5 जानेवारीला होणार आशा व गटप्रवर्तकांचा मोर्चा

5 जानेवारी रोजी आशा व गटप्रवर्तकांचा प्रलंबीत मागण्यांना घेऊन यवतमाळ जिल्हा परिषदवर मोर्चा

यवतमाळ :- आशा व‌ गटप्रवर्तक यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्या प्रलंबीत मागण्यांना घेवून आयटक संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहेत. केलेल्या कामाचा मोबदला सुद्धा पूर्ण मिळत नाही. जिल्ह्यांमध्ये तर मागील एक वर्षापासून covid-19 भत्ता व इतर केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. तसेच सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून वाढीव मानधन मिळालेले नाही. एक जुलै 2021 पासून मानधना मध्ये जी वाढ केली ती अजुन मीळाली नाही. तसेच आरोग्य वर्धनी केंद्रातील आशांचे मानधन थकीत आहे , ग्राम पंचायत मार्फत देणाऱ्या भत्याची अंमलबजावणी करण्यास तयार नाही आशांना आरोग्य कर्मचारी सोडून इतर कोणतेही कर्मचारी कोवीडची माहीती , याद्या मागत आहे , कोवीड मध्ये आठ आठ तास त्यांच्या डीवट्या लावल्या जात आहे , वरीष्टाकडून सतत अपमान जनक वागणूक मीळत आहे या सर्व अन्यायाविरुद्ध दि.०५ जानेवारी २०२२ रोजी आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने यवतमाळ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशा व गटप्रवर्तकांना कोविड भत्ता पुर्ववत मीळाला नाही व मागण्या निकाली काढल्या नाहीतर कोवीड कामावर कायमचा बहीस्कार टाकन्याचा निर्णय घेण्यात आला आहे दि. ५ जानेवारी 2022 रोजी क्रांतीजोती सावित्रीबाई फुले जन्म दिनी यवतमाळ जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकणार आहे. मोर्चा श्रम शक्ती भवन आयुर्वेदीक दवाखाना आर्णी रोड यवतमाळ येथुन निघेल तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तकांनी ११ वाजता वेळेवर उपस्थीत राहण्याचे आवाहन कॉ.दिवाकर नागपुरे जिल्हा सचिव यांनी केले आहे असे प्रसीद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे

Copyright ©