यवतमाळ राजकीय सामाजिक

दिग्रस चे शिव स्मारक आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरणार तर नाही ना !

 संपादक सदानंद जाधव

दिग्रस चे शिव स्मारक आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरणार तर नाही ना !

अपराजित आमदारांसह सत्तेतील शिवसैनिकांचे दुर्लक्ष!

परिवर्तन हा सृष्टीचा नियमच आहे याचाच एक पैलू म्हणून दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव राज मुद्रा चे स्मारक होते. शहरातील मुख्य चौक असल्याने व वर्दळीचे ठिकाण असून या ठिकाणी शिव राज मुद्रेची प्रतिष्ठापना होती मात्र शिव राज मुद्रेच्या ओटयाची एवढी दुरावस्था पाहायला मिळत होती त्याची कल्पना करणेही दूरच ठेवावी लागेल. वास्तविक पाहता दिग्रस मतदार संघामध्ये अपराजित आमदार म्हणून शिवसेनेचे वर्चस्व कायम असताना तसेच दिग्रस नगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेनेचीच सत्ता असल्याने मग ते मतदार संघाचे आमदार असो की नगरपालिकेतील शिवसेनेचे पदाधिकारी असो कोणाचीही या स्मारकात परिवर्तन करून घेण्याची किंवा परिवर्तन घडवून अन्याची इच्छाशक्तीचा अभाव लक्षात घेता. दिग्रस शहरातील उभरते नेतृत्व प्रणित मोरे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा मावळ्याने दिग्रस शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील दुरावस्थेत असलेल्या शिव राजमुद्रा च्या ठिकाणी त्याचे परिवर्तन करून छत्रपती शिवाजी महाराज उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकीय क्षेत्रात आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न अनेक लोक प्रतिनिधी कडून केल्या जाते मात्र शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिव राजमुद्रा व त्या ओट्याची दुरुस्ती सुद्धा गेल्या अनेक वर्षात फार्स ठरली.मात्र प्रनित मोरे या तरुणाच्या कल्पनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसैनिकांना जनु चपराकच लगावल्याने शहरासह संपूर्ण तालुक्यात या युवकाचे कौतुक होत आहे. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीची नागरिक स्वतःच वाट पाहू लागल्याने सत्ता परीवर्तनाची आस नागरिकांच्या मनी लागली तर नाही ना ! सर्वत्र चर्चा होत असून तसेच नुकताच दिग्रस शहरामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये माजी नगराध्यक्षाने दिग्रस च्या सत्ताधार्यां सोबत नसून मी विकास पुरुषासोबत असल्याचे वक्तव्य केल्यामुळे दिग्रस मधील पालिकेच्या सत्तेमध्ये परिवर्तन होण्यासाठी दिग्रस चे शिव स्मारक टर्निंग पॉइंट तर ठरणार नाही ना ? अशी दिग्रस शहरात सर्वत्र चर्चा होत आहे

Copyright ©