यवतमाळ सामाजिक

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाकरीता ११७ कोटींचा निधी -आमदार संजय राठोड यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाकरीता ११७ कोटींचा निधी
-आमदार संजय राठोड यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

-राज्य शासनाने आतपर्यंत दिले ५७४.६२ कोटी रूपये
यवतमाळ – केंद्र व राज्य शासनाच्या ६०:४० टक्के निधीतून निर्माण होत असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाचे बहुतांश काम सर्वत्र सुरू आहे. या कामास गती मिळावी यासाठी राज्य शासनाने आपल्या हिस्याचाचा ११७.३३ कोटी रूपयांचा निधी रेल्वेस नुकताच उपलब्ध करून दिला. याबद्दल जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. या निधीमुळे वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामास गती मिळले, असे आमदार राठोड यांनी म्हटले आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाकरीता २,५०१.०५ कोटी इतका खर्च प्रस्तावित आहे. या खर्चापैकी राज्य शासनाने आपल्या वाट्याचा १०००.४२ कोटी रूपये हा ४० टक्के निधी केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत १०२५.९६ कोटी रूपये खर्च केला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात रेल्वेने या प्रकल्पासाठी २५५.०१ कोटी रूपयांची तरतूद केली होती. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची फरकाची २७९.३६ कोटी रूपयांची रक्कम अदा करण्याबाबत मध्य रेल्वेने १ सप्टेंबर रोजी कळविले होते. या मार्गामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्तप्रवण क्षेत्रातील वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसह विदर्भ-मराठवाडा लोहमार्गाने जोडला जाणार आहे. या महत्वकांक्षी रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत आपल्या हिस्याचीचा ५७४.६२ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने मागणी केलेली रक्कम राज्य शासनाने नुकतीच वितरित केली. त्यामुळे वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या या रेल्वेमार्गाच्या कामास गती येईल, असे आ. संजय राठोड यांनी म्हटले आहे. या मार्गासाठी बहुतांश ठिकाणी भूसंपादनाची कामे झाली आहेत. अनेक लहान, मोठ्या पुलांची निर्मिती झाली आहे. आता राज्य शासनाचा निधी प्राप्त झाल्याने अनेक ठिकाणी ही कामे अधिक गतीने होईल, असे आ. राठोड म्हणाले.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाकरीता गृह विभागाच्या वतीने वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी, मध्य रेल्वे यांना ११७.३३ कोटी रूपये वितरित करण्यास मंजुरी देऊन २२ डिसेंबर रोजी राज्य शासनाने यासंदर्भात आदेश काढले. राज्य शासनाने आपल्या वाट्याचा हा निधी दिल्याने आमदार संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. तसेच निधी मिळाल्यामुळे वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचे काम गतीने पुढे सरकण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आमदार राठोड यांनी व्यक्त केली.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©