यवतमाळ सामाजिक

सामजिक कार्यकर्ते जम्मु खान यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन

तालुका प्रतिनिधि :- निलेश अ. चौधरी

सामजिक कार्यकर्ते जम्मु खान यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन

तालुक्यातील समाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले जमीर खाॅन उर्फे जम्मु भाई यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण वणीकर जनतेसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करून गोर- गरीब जनतेसाठी ,अप्रतिम डाॅक्टरांची टिम तयार करुन , कुठल्याही व्यक्तीला सहकार्य देण्याच्या उदांत्त हेतुने , आशियाना हाॅल येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्त्रिरोग तज्ज्ञ म्हणून डाॅ.महेंद्र लोंढा तसेच डाॅ. प्रेमानंद आवारी , मुत्ररोग तज्ञ म्हणून डाॅ.अमित देशपांडे नागपुर,
आरोग्य तपासणीसाठी डाॅ.सुरज चौधरी ,बालरोग तज्ज्ञ म्हणून डाॅ. संदिप मानवटकर व डाॅ. पवन राणे ,नेंत्र तपासणी आणी चष्मा वाटप यासाठी डाॅ. स्वप्निल गोहोकार ,अस्थिरोग तज्ञ सुबोध अग्रवाल या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यावेळी कार्यरत आहे.
वाढदिवस म्हणजे जल्लोषाचे कार्यक्रम आणी यामध्ये लाख्खोंची उधळण ही समिकरण वणी येथील राजकीय वर्तुळात पसरलेली आहे. परंतु जम्मु भाई या साठी अपवाद ठरत ,वाढदिवसानिमित्त कुठलाही ,मोठेपणा न करत..जनतेच्या सेवेसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. त्यामुळे संपुर्ण वणी शहरात जम्मु भाईचा वाढदिवस हा प्रसंन्नेचा विषय ठरत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©