यवतमाळ सामाजिक

पी एम किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी बँक खाते ई- केवायसी करून घ्यावे- जिल्हाधिकारी

पी एम किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी बँक खाते ई- केवायसी करून घ्यावे- जिल्हाधिकारी

यवतमाळ, दि 29 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(pm – kisan) योजनेतंर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी लाभाचे हप्ते सुरळीत बँक खात्यात जमा होण्याकरीता त्यांचे बँक खाते

ई -केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी एम किसान) योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. जिल्ह्यात एकूण 4 लाख 62 हजार 252 खातेदार असून त्यापैकी पी एम किसान योजना अंतर्गत 3 लाख 95 हजार 234 शेतकऱ्यांची नोंदणी पी एम किसान पोर्टल वर झालेली आहे. लाभाचे हप्ते पात्र व नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लाभाचे हप्ते सुरळीतपणे बँक खात्यात जमा करण्याच्या उद्देशाने बँक खात्याची ई -केवायसी ( e-kyc) करणे आवश्यक आहे .सदर प्रक्रिया दिनांक 31 मार्च 2022 पूर्वी पूर्ण करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहे. पी एम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत ई केवायसी ( e-kyc) करण्याकरिता दोन पद्धतीचा अवलंब करता येईल .

1 )ओ टी पी मोड : – या प्रक्रियेमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी( pm kisan) योजनेच्या पोर्टल वर किंवा पी एम किसान अँपद्वारे लाभार्थ्याला स्वतः किंवा संबंधित कर्मचाऱ्यांकडून मोफत ई केवायसी करता येईल.

2) बायोमेट्रिक मोड :- या प्रक्रियेमध्ये नजिकच्या नागरी सेवा (csc) केंद्रावर जावून ई केवायसी करता येईल. यासाठी 15 रुपये शुल्क भरावे लागेल.

या पद्धतीचा अवलंब करून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (pm- kisan) योजना अंतर्गत सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई केवायसीची प्रक्रिया लाभाचा पुढील हप्ता मिळण्यापूर्वी पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून लाभाचा पुढील हप्ता सुरळीत व योग्यपणे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
______________________________________
दि. 29 डिसेंबर 2021

*राळेगाव नगरपंचायतच्या सदस्यपदासाठी आरक्षणाची सुधारित अधिसूचना प्रसिद्ध*

 

यवतमाळ, दि 29 :- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव नगरपंचायतच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला अशा आरक्षणास अंतिम मान्यता मिळालेली आहे. सदर सुधारित आरक्षणाची अंतीम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचना राळेगाव नगरपंचायत कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय yavatmal.nic.in या वेबसाइटवर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधित नगरपंचायतमधील नागरिकांना सदर अधिसूचना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

Copyright ©