यवतमाळ सामाजिक

महाविद्यालयीन मुलींनी खूप मेहनत करून आपले नांव उज्वल करावे -प्रा.राजकुमार नेम्मानीवार

महाविद्यालयीन मुलींनी खूप मेहनत करून आपले नांव उज्वल करावे -प्रा.राजकुमार नेम्मानीवार

बळीराम पाटील महाविद्यालयात महीला तक्रार निवारण समितीच्या वतीने आजादी का अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन प्राचार्य डॉ शिवराज बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २८ डिसेंबर २०२१ महाविद्यालय परीसरात वावरत आसतांना त्यांच्या आडीआडचनी दूर करून त्यांच्या समस्याचे निरसन करण्यासाठी महीला तक्रार निवारन समितीने खुल्या चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर होते. प्रमुख पाहुणे प्रा. राजकुमार नेम्मानीवार हे होते. ते बोलतांना म्हनाले महिलांनी आपल्या मधील नैसर्गिक शक्तीची आठवन करून आपले बलस्थान ओळखून मार्गक्रम केल्यास भविष्य हे उज्ज्वल आहे.पुढे बोलतांना म्हनाले मुलीनी खुप आभ्यास करून महाविद्यालयाचे व आपले नांव मोठे करावे. याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे, संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेम्मानीवार, प्रा.ममता जोनपेल्लीवार, डॉ आर.आर. कोमावार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महीला तक्रार निवारण समीतीच्याविभाग प्रमुख प्रा.ममता जोनपेल्लीवार यांनी केले. प्रसंगी त्यांनी महीला व तक्रार निवारण समिती चे उद्देश व कार्य सांगितले.विद्यार्थ्यीनीना आपल्या समस्या मांडण्यास प्रेरित करून त्यावर चर्चा करण्यात आली.
यानंतर उपप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात बोलतांना म्हणाले मुलीनी निर्भयपने जीवनाची वाटचाल करावी.येणाऱ्या आडचनीस सामोरे जात आसतांना महाविद्यालयीन प्रशासन व संस्था सदैव मुलीच्या पाठीशी आहे आसे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर बोलतांना म्हणाले मुलींनी आपले प्रश्न तक्रार निवारण समिती कडे मांडावे तात्काळ त्यावर निरसन करू आसे ते म्हणाले.महाविद्यालयाच्या विकासात महीला प्राध्यापिका व विद्यार्थ्यीनीनी आजवर केलेल्या कार्याचा व प्रगतीचा उल्लेख केरत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास जेष्ठ प्राध्यापिका डॉ. आर.आर.कोमावार, महीला तक्रार निवारण समितीच्या सदस्या यमुना कुमरे, इंग्रजी विभागाच्या डॉ. पी.डी.घोडवाडीकर, वानिज्य विभागाच्या प्रा.आम्रपाली हाटकर, समाजशास्र विभागाच्या सुलोचना जाधव,डॉ. रचना हिपळगावकर, डॉ स्वाती कुरमे, डॉ. विजया खामनकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.व कार्यक्रम यसयस्वी करण्यास सहभाग दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा.ममता जोनपेल्लीवार यांनी मानले.व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी झाली.

Copyright ©