Breaking News महाराष्ट्र सामाजिक

उमरखेड मधिल बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या प्रा डॉ मिनाक्षी सावळकर यांची मागणि मा.ना .उध्दवजी ठाकरे ,

उमरखेड मधिल बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या प्रा डॉ मिनाक्षी सावळकर यांची मागणि
मा.ना .उध्दवजी ठाकरे ,

मुख्यमंत्री , महा . राज्य मंत्रालय , मुंबई . यांचे सेवेशी , मे . जिल्हाधिकारी साहेब

जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ .
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुलीवर बलात्कार करून तिला जिवेमारुन टाकल्याबद्दल आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा होणे करीता जलतगती न्यायालयाची निर्मिती करुन सि . बी . आय . चौकशी करुन आरोप निश्चित करणे बाबत . मार्फत :
*विषय : महोदय , मौजे उमरखेड ता . उमरखेड जि . यवतमाळ येथे दंगल नियंत्रण पथकात कार्यरत विजय हटकर या पोलिस कर्मचाऱ्याने मौजे वेणी पो . हषी ता . पुसद जि . यवतमाळ*
मौजा उमरखेड येथील कु . गंगा संजय कोरडे वय वर्षे २० हिला दि . २४/१२/२०२१ शुक्रवारला त्याने भाडे पटयावर घेतलेल्या वसंतनगर उमरखेड जि . यवतमाळ चे राहते घरी खोटे तुला नौकरी लावुन देतो असे अमिश दाखवुन बोलावून घेतले व तिचेवर अमानुश पणे बलात्कार केला व जिवेमारुन टाकले व तीचे मृतशरिर त्याचेच घरात लटकवले व तिनेच आत्महत्या केली असा बनाव केला . तरी त्याचेवर खुन करणे , बलात्कार करणे खोटी आश्वसने देवुन तिच्या मजबुरीचा फायदा घेणे , तिला ठगविणे आदि संबंधित त्याचेवर कलमान्वये गुन्हयाची नोंद होणेसाठी जलतगती न्यायालयाची निर्मिती करुन सदर प्रकरणाची सि . बाय . आय . मार्फत चौकशी करण्यात यावी . व पिडीत कुटूंबास स . ५०,००,००० / -रु ( अक्षरी पन्नास लाख ) रुपयेची मदत देवुन तिच्या कुटूंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावुन घ्यावे . हि विनंती , जर वरील बाबींची पुर्तता झाली नाही तर सकल समाज महाराष्ट्र भर उग्र आंदोलन छेडेल हयाची नोंद घ्यावी .आज विविध महिला संघटनांनी आणि चर्मकार समाज यांचे कडुन पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना डॉ प्रा मिनाक्षि सावळकर राज्य समन्वयक काँग्रेस कमिटी कामगार असंघटीत ‌ सौ सागरताई पुरी समन्वयक शिवसेना प्रा वर्षाताई निकम. राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी मनीषा तिरणकर सामाजिक संघटना दुर्गा पटले नारी संघटना अमर तांडेकर चर्मकार संघटना डॉक्टर तांडेकर सोनाली मरगडे सामाजिक संघटना मनिष घोसाळकर इत्यादी संस्थेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

Copyright ©