यवतमाळ सामाजिक

दुचाकीवर ट्रिपल सीट असल्यास लायसन्स होणार निलंबित

वणी तालुका प्रतिनिधी :- निलेश अ. चौधरी

दुचाकीवर ट्रिपल सीट असल्यास लायसन्स होणार निलंबित
—‐–‐‐—————————————
सुधारीत कायद्याची अंमलबजावणी : फॅन्सी नंबरसाठी एक हजाराचा दंड
———————————————–
वाहनचालकांनो सावधान : वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा दंड भरा..!

मागील काही वर्षांपासून संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे शासनाने नविन नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये दंडात्मक रक्कमेत वाढ करणात आली असुन वाहन परवाना नसल्यास परवाना निलंबनाची नामुष्की ओढावणार आहे.
आता ट्रिपल सीट दुचाकी चालविल्यास एकच नियमाच वारंवार उल्लंघन केल्यास, लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित होणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.अवैद्य वाहतुक केल्यास १०,००० रु पर्यंतचा दंड न्यायालयामार्फत ठोठावण्यात येणार आणी मद्यप्राशन करुन, दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवितांना आढळून आल्यास ,१०,००० रु. दंड आकारण्यात येणार आहे.आणी अठरा वर्षाखालील मुलगा दुचाकी चालवितांना आढळून आल्यास,मुलाच्या पालकाला १०,००० रु. पर्यंतचा दंड आकारण्यात येणार असल्याचे यावेळी वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी पत्रकारशक्ती शी सांगितले.तसेच एकच चुक वारंवार होत असल्यास ,परवाना तीने महिन्यासाठी निलंबित होणार आहे.केंद्रीय मोटर वाहन सुधारीत अधिनियधानुसार दंडाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यासह वणी तालूक्यात सुध्दा झाली आहे.
आगामी काही वर्षापासून वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहे.
त्यामुळे हा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
———————————————–
आज वणी शहर हे नैसर्गिक साधन संपत्ती असलेले शहर आहे.
दिवसेंदिवस रस्त्यावर वाहनाची संख्या वाढलेली आहे. लोकसंख्येचे दृष्टिकोनातून वणी शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते अरुंद आहेत. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढलेली असुन येथे साधनसंपत्तीच्या दृष्टिकोनातून जड वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे अशावेळी लोकांची जीविताची सुरक्षितता हे एक पोलिस विभागाला आव्हान आहे. लोकांनी जास्तीत जास्त पायदळ किंवा वाहन (चालविणे )रस्त्यावर असताना वाहतुकीचे नियम पाळावे.आज सर्व भारतात वाहनाचा चालन दर वाढलेला आहे. सर्व लोकांनी याची दक्षता घेऊन जास्तीत जास्त वाहतुकीचे नियम पाळावे हे वणी वाहतूक शाखेचे निरीक्षक श्री. मुकुंद कवाडे यांनी जनतेला आव्हान आहे.
श्री.मुकुंद कवाडे ( वाहतुक शाखा निरिक्षक)

Copyright ©