यवतमाळ सामाजिक

अमोलकचंद महाविद्यालयात रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

अमोलकचंद महाविद्यालयात रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

स्थानिक विद्या प्रसारक मंडळ, यवतमाळ द्वारा संचालित अमोलकचंद महाविद्यालतील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय केडेट कोअर(एनसीसी) व रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठावीस डिसेंबरला वसंतराव नाईक सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राममनोहर मिश्रा, एनसीसीचे अधिकारी व्यंकटेश , रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यवतमाळ चे प्रमुख दिनेश राजा, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीचे डॉ.भूषण , सेवा अधीक्षक अविनाश जानकर , राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.अनंत सूर्यकार, राष्ट्रीय सेवा योजना, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.माधुरी भादे, , एनसीसी प्रमुख डॉ.कमलेश तुमसरे, राष्ट्रीय सेवा योजना सह- कार्यक्रम अधिकारी प्रा.सचिन वानखेडे व महाविद्यालयातील प्राध्यापक तथा कर्मचारी वर्ग, रक्तपेढीचे तांत्रिक व कर्मचारी, एनसीसीचे अधिकारी व कर्मचारी प्रसंगी उपस्थित होते.
मान्यवरांनी विचार व्यक्त करताना रक्तदान किती मोलाचे आहे हे प्रतिपादन केले.
एनसीसी व एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी उत्साहाने रक्तदान केले.तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संदेशात्मक पथनाट्यसुद्धा सादर केले.
सूत्रसंचालन प्रियंका हिने तर डॉ अनंत सूर्यकार यांनी सर्व मान्यवरांचे व सहभागी घटकांचे आभार मानले.

Copyright ©