यवतमाळ सामाजिक

नगर सेवा समितीच्या वतीने सायकलिस्ट ,प्रणाली चिकटे हीचे शहरात भव्य स्वागत

 वणी तालुका प्रतिनिधी :- निलेश अ. चौधरी

नगर सेवा समितीच्या वतीने सायकलिस्ट ,प्रणाली चिकटे हीचे शहरात भव्य स्वागत

“सायकल चालवा ,कोरोना पळवा” असा संदेश देत , संपुर्ण महाराष्ट्राचा प्रवास करुन ,सायकल द्वारे संपुर्ण गावो-गावी , कोराना संदर्भात जनजागृती करीत , आज मंगळवार(28 डिसें.) वणी शहरात दाखल झालेल्या प्रणालीचे नगर सेवा समितीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.प्रणालिने सायकलने संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास करून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रेरीत करुन मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबवित ,आज एक वर्षाच्या नंतर वणी शहरात आगमन करणा-या कु. प्रणाली चिकटेचे हीचा भव्य सत्कार व स्वागत शहरातील साईमंदिर चौकात नगरसेवा समिती व स्माईल फाऊंडेशन च्या वतीने नगरसेविका सौ.वर्षा राजेश खुसपूरे , विजूभाऊ चोरडीया यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नगर सेवा समितीचे दिलिप कोरपेनवार सर, रमेश बोबडे , सुभाष आडे , कुंतलेश्वर तुरविले ,सागर जाधव व मान्यवरांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.आणी सायकल रॅलीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

Copyright ©