Breaking News यवतमाळ सामाजिक

मोमीनपूरा परिसरातील बालकावर एका अज्ञात व्यक्तींने फेकले रसायन

 वणी तालुका प्रतिनिधी :- निलेश अ. चौधरी

मोमीनपूरा परिसरातील बालकावर एका अज्ञात व्यक्तींने फेकले रसायन

शहरातील मोमीनपुरा परिसरातील बालकावर एका अज्ञात व्यक्तींने फेकले रसायन”कम्लद्रव्य “फेकले.हि घटना रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सूमारास शहरातील हामीद चौक परिसरात घडली,रविवारी सायंकाळच्या सूमारात हामीद चौक परिसरात लहान मूले खेळत होती.याच दरम्यान एक अज्ञात व्यक्ती तेथे आला व त्याने 6 वर्षाच्या बालकावर अाम्लद्रव्य फेकले.त्यानंतर तो तेथून पसार झाला.हि बाब बालकाने आपल्या कूटूंबियांना सांगितली,त्यानंतर त्याला उपचारासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.विशेष म्हणजे शनिवारी याच बालकाच्या 8 वर्षीय बहिनीवर सूध्दा अज्ञांत इसमाने आम्लद्रव्य फेकले होते.डाँक्टरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल,असे पोलीसांनी सांगीतले.
दरम्यान या व्यक्तीने फेकलेले द्रव्य अॅसिड नसल्याचे रूग्णालयातून सांगण्यात आले.सध्या जखमीची प्रकृती धोक्याबाहेर आहे

Copyright ©