यवतमाळ सामाजिक

कोल वाॅशरीच्या प्रदुषणामुळे परिसरातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नूकसान :- विजय पिदूरकर ( मा.जि.प.सदस्य)

 वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश अ. चौधरी

कोल वाॅशरीच्या प्रदुषणामुळे परिसरातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नूकसान :- विजय पिदूरकर ( मा.जि.प.सदस्य)

तालूक्यात मोठ्या प्रमाणात कोल वाॅशरी असल्यामुळे,मोठ्या प्रमाणात जड वाहतुक होत असल्यामुळे उडणार्‍या धूळीमूळे रोड लगतच्या शेतातील पिकावर मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ साचलेली आहे. त्यामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नूकसान होत आहे. सततच्या ओव्हरलोड वाहतूकीमूळे विद्यार्थ्यांना जिव मुठीत घेऊन शाळेचा प्रवास करावा लागतो आहे.
त्याच बरोबर पिकावर मोठ्या प्रमाणात धूळ साचल्यामुळे, शेतीच्या मशागतीसाठी मजूर सूध्दा यायला तयार नसतात, त्यामुळे शेतमालची मोठ्या प्रमाणात पत खालावली जाते. त्यामुळे एकरी दहा क्विंटल होणारा माल ,प्रदूषणामुळे दोन क्विंटलवर आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.प्रदुषणामुळे काळा झालेल्या कापसामुळे भाव कमी मिळत आहे.आणी आरोग्य खराब होत आहे.
प्रदूषण मंडळाच्या आदेशानुसार रोडच्या दोन्ही बाजुने, बांबूची झाडे लावावी,कोलवाॅशरी ते ब्राम्हणी फाटा रस्त्याचे रूंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे बांधकाम करावे.निळापूर-ब्राम्हणी
येथील नागरिकांचे डोळे,त्वचा व आरोग्य तपासून उपचार करावे,सी.एस.आर.मधून निळापूर-ब्राम्हणी येथे विकास कामे करुन सुविधा करुन द्याव्या,शेतकर्‍यांच्या शेतमालाची होणारी नूकसान भरपाई साठी तंत्र तज्ञ पध्दतीने सर्व्हे करून, महामिनरल कोल वाॅशरी कडून एकरी 25 हजार रु. पंधरा दिवसाच्या आत देण्यात यावे.अशी मागणी यावेळी विजय पिदूरकर यांनी केली आहे.मागण्या पुर्ण न केल्यास ,ब्राम्हणी व निळापुर येथील नागरीकांनकडुन जड वाहतुक बंद करण्यात येईल. अशा आशषयाचे निवेदन, उपविभागीय अधिकारी डाॅ,शरद जावळे यांचे मार्फत जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक अधिकारी,प्रदूषण नियंत्रण मं.,चंद्रपूर यांना मा.जि.प.सदस्य विजय पिदूरकर भाजपा तालूकाध्यक्ष गजानन विधाते यांच्या नेतृत्वात परिसरातील शेकडो शेतकर्‍यांनी दिले आहे.

Copyright ©