Breaking News यवतमाळ सामाजिक

अनैतिक सबंधातून खून करून आत्महत्येचा देखावा करणार्‍या चारही आरोपीला केले जेरबंद

वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश अ. चौधरी

अनैतिक सबंधातून खून करून आत्महत्येचा देखावा करणार्‍या चारही आरोपीला केले जेरबंद

तालूक्यातील राजूर(काॅ) येथील चूना भट्टीचे वसाहतीचे लेबर काॅर्टर ला (20 डिसें.)सोमवारला अतूल सहदेव खोब्रागडे(39) रा.राजूर (काॅ) याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकिस आली.या घटनेची माहिती पोलीसांना कळताच, पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून ,मृतदेह शवविच्छेदन करण्या करिता रूग्णालयात दाखल केला.मृत्तकाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये गळा आवळून श्र्वसन क्रिया बंद झाल्याचा अभिप्राय आल्याने कलम 302(34)भा.द.वि प्रमाने अज्ञांत अारोपी विरूध्द गून्हा दाखल करून सदर गून्ह्याचा तपासाचे चक्र सह.पो.नि.माया चाटसे व टिम यांनी पून्हा घटनास्थळी जावून पडताळणी केली असता मृत्तक यांचे सौ.सोनू राजू सरावणे या महिलेसोबत अनैतिक सबंध असल्याचे निदर्शनात आले.सदर आरोपी ही त्याच घटनास्थळाच्या क्काॅटरमध्ये राहत होती.संशयाच्या आधारे तीला ताब्यात घेवून विचारपूस केली असता, तीने वारंवार बयान बदलवून तपासाची दिशाभूल केली.परंतू त्या दरम्यान (23 डिसें.) गुरुवारला सोनू राजू सरावणे व भाटवा हर्षद आनंदराव जाधव यांना अटक करून 3 दिवस पी.सी.आर.घेऊन विचारपूस केली असता आरोपी महिला हीचे वडील राजेश आनंदराव वाघमारे व मामा शंकर नथ्थूजी वरघणे यांनी मिळून मृत्तक अतूल सहदेव खोब्रागडे यास जिवानिशी ठार मारल्याची कबूली दिली.सदर गून्ह्यात रविवारला(26 डिसें.) रोजी अटक करण्यात आली.आरोपी हर्षद जाधव हा आरोपी सोनू सरावणे हीच्या सोबत वाईट नजर ठेवून होता.घटनेच्या दिवशी आरोपी हर्षद जाधव हा सोनू सरावणे हिच्या घरी गेला असता, तेथे मृत्तक अतूल खोब्राखडे हा महिला अारोपी सोबत तिथेच हजर होता.मृत्तक अतूल खोब्रागडे व आरोपी हर्षद जाधव यांच्यामध्ये वाद झाला.नंतर महिला आरोपी सोनू सरावणे हिने आपले वडील राजेश वाघमारे व तीचे मामा शंकर सरावणे यांना राजूर काॅलरी येथे फोनद्धारे बोलावून मृत्तक अतूल खोब्रागडे याचा गळा दाबून जिवानिशी मारून अारोपी राजेश वाघमारे व शंकर वरघणे हे दोघेही मदना(मदनि)जि.वर्धा येथे निघून गेले या वरून अारोपी विरूद्ध कलम 302(34)गून्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई दिलीप पाटील भुजबळ , खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक, संजय पुज्जलवार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या नेतृत्वात सहा.पो.नि.माया चाटसे यांनी केला.

Copyright ©