बेला प्रतिनिधी कैलास साठवने
हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने पेन्शन दिंडी काढण्यात आली
आज शुक्रवार दि.24 डिसेंबर 2021ला मुंबई येथे हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने पेन्शन दिंडी काढण्यात आली. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शासकीय/ निमशासकीय, शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी जूनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021 पासून पडघा (ग्राम) कल्याण येथून विधान भवन मुंबई येथे 60 किमी अंतर पार करून पायदळ पेन्शन दिंडी काढण्यात आली. यावेळी ही लोकशाही, अहिंसेच्या व शांततेच्या मार्गाने सुरू असलेली पेन्शन दिंडी शासनाने पोलिस विभागाच्या मार्फत दंडुकेशाहीचा वापर करून दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न केला व अनेक पेन्शन फायटरना अटक करून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल केले.या चुकीच्या बाबीचा निषेध करण्यासाठी व सर्व पेन्शन फायटर यांचेंवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करावी या विषयाचे निवेदन आज शुक्रवार दि. 24 डिसेंबर 2021 ला मा. जिल्हाधिकारी वर्धा यांचे मार्फत मा. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले. जूनी पेन्शन संघटनेचे नागपूर विभागीय सचिव हेमंत पारधी, राज्यसमन्वयक सुशील गायकवाड, जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे, जिल्हा सचिव प्रमोद खोडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मंगेश भोमले, नागपुर विभाग समन्वयक मनोज पालिवाल, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख आशिष बोटरे यांना अटक करून गुन्ये दाखल करण्यात आले त्याबद्दल वर्धा तालुकाध्यक्ष प्रा. रितेश निमसडे, वर्धा जिल्हा खाजगी प्राथमीक विभाग महिला आघाडी प्रमुख सौ अश्विनी इंगोले, उपप्रमुख कु. सिमा खेडकर, कांचन भगत, सेलू तालुकाध्यक्ष विनोद वाडीभस्मे, अमोल गेडाम निवेदन देतांना उपस्थित होते.
Add Comment