यवतमाळ सामाजिक

क्रांतीवीरांच्या स्मारकाचे उदघाटन व लोकार्पण .

 सदोबा सावळी प्रतिनिधी आशिफ खान

क्रांतीवीरांच्या स्मारकाचे उदघाटन व लोकार्पण .

गोंडवाना गौरव शहीद क्रांती विर बापूराव पुल्लेसुर शेडमाके यांचे स्मृती पर्व व क्रांतीसुर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंती परवा निमित्त शहीद क्रांतिवीरांच्या भव्य स्मारकाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम ईचोरा ( ता.आरणी ) येथे आज दिनांक 12/12/ 2021 रविवार रोजी पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन मसराम , हे होते , तर प्रमुख अतिथी म्हणून आ. संदीप धुर्वे , माजी आमदार राजूभाऊ तोडसाम , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मुबारक तंवर , जि.प.सदस्य प्रकाश राठोड , पारवा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण साहेब , घाटंजी पंचायत समिती चे माजी उपसभापती रमेश धुर्वे , आर्णी पंचायत समिती चे माजी सभापती सुरेश जैस्वाल, कु. दुर्गा जंगा किनके सरपंच ईचोरा ईत्यादी मान्यवर मंडळी मंचकावर विराजमान होते.
यावेळी निरंजन मसराम व राजू तोडसाम यांनी समाजाला अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास
विजय राठोड अध्यक्ष तंटामुक्ती, दिनेश जाधव पोलीस पाटील , रविंद्र राठोड , अजाबराव सलाम, विठ्ठल सोयाम, अनिल जगदाळे ,जिवन तोडसाम , लिंगाजी मंगाम , नितेश विलास राठोड , शितल अनिल जगदाळे , तानाजी किनाके , डॉ. सुरेंद्र कोवे , सहदेव कुडमते , विठ्ठल तुमराम , गणपत पाटील जगताप , गणेश चव्हाण , सुरज जाधव व ईचोरा गावातील व परिसरातील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

वाघाच्या हल्ल्यात दोन गायी ठार

तालुक्यातील सावळी दक्षिण वनपरिक्षेत्रात चिंच बर्डी आणि माळेगाव शिवारात वाघाने गायीवर हल्ला चढविला यात दोन गायी, ठार झाल्यात ही घटना शुक्रवारी उघडकीस आली चिंच बर्डी शिवारात अंबादास जाधव आणि माळेगाव शिवारात सुभाष चव्हाण यांच्या मालकीच्या गाईवर वाघाने हल्ला केला.
त्यात दोन्ही गायी, ठार झाल्या अंबादास जाधव यांचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले सावळी दक्षिण वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसापासून वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. परिसरात त्यांनी धुमाकूळ घातला आहे. सुभाषनगर, चिंच बर्डी, बारभाई, वरुडा, दहेली, कृष्णनगर, माळेगाव, पाळोदी आदी, गावात वन्य प्राण्यांनी हल्ले केले.

Copyright ©