यवतमाळ सामाजिक

वाटखेड जि. प. शाळेतील शिक्षकाच्या अश्लील चाळ्यानी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

वाटखेड जि. प. शाळेतील शिक्षकाच्या अश्लील चाळ्यानी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
———————————————
यवतमाळ-पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाटखेड जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक आर. पी. पद्यावार हे शाळेतील छोट्या छोट्या विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे करीत असल्याचे पुढे आले असून येथिल विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
मागील काही वर्षांपासून वाटखेड जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक महाशयाचे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी कृत्य नित्याचे झाले आहे. आदिवासी बहुल असलेल्या गावातील निरागस बालकांना शिक्षणाचे धडे देण्याऐवजी नको ते शब्द वापरणे विद्यार्थ्यांना जवळ बोलावून आपल्या शरीराच्या नको त्या भागास हात लावायला लावणे. एवढेच नव्हे तर बाथरूम कडे जावून विद्यार्थ्यांना जवळ बोलावून अश्लील अवयव दाखविण्याचे प्रकार हा शिक्षक करीत आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आपापल्या पालकांना सांगितली. यावरून पालकांनी शाळेकडे धाव घेत या शिक्षकास जॉब विचारला असता गावातीलच काही नागरिक मध्यस्ती करून वातावरण शांत केले. आदिवासी बहुल असलेल्या या गावातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा हा शिक्षक घेत असल्याचे पुढे आले आहे. काही पालकांनी हिम्मत करून या शिक्षकाविरूद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. मात्र यातही गावातील ग्राम पंचायतचा एका पदाधिकाऱ्याने व खुद्द जि. प. शिक्षण अधिकारी यांनी यात मध्यस्ती करून प्रकरण माघारी आणले त्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार होऊ शकली नाही. येथिल गंभीर प्रकार शिक्षण अधिकारी यांना माहीत आहे. या शिक्षकाचे एक ते चार चा प्रस्ताव सुध्दा तयार असल्याचे समजते मात्र या शिक्षकावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही हा संशोधनाचा विषय आहे. या शिक्षकाच्या वागणुकीवरुन पालक वर्ग आक्रमक झाली होती. यात शिक्षण अधिकाऱ्याने मध्यस्ती बजावित या शिक्षकाचे इतरत्र स्थलांतर करतो तुम्ही शांत वा असा सल्ला देवून प्रकरण शांत केले. या शिक्षकाला खुद्द शिक्षण अधिकाऱ्याचे पाठबळ का? यावर अनेक चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी सुध्दा बेलोरा येथिल शिक्षकाने माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडवली होती. त्याची चर्चा थांबत नाही तोच हा प्रकार चर्चेत आला आहे. मात्र या कुबुद्धीच्या शिक्षकांना अधिकारी पाठीशी का घालत असावे यात अधिकाऱ्यांचा काय फायदा असेल असे एक ना अनेक सवाल उपस्थित केला जात आहे. या गावात आदिवासी बहुल पालक असल्याने आपली हिम्मत न दाखविता मध्यस्तींचे ऐकून कुठेही तक्रार केली नसली तरी या शिक्षकाचे अश्लील चाळे वास्तव आहे. असे पालक वर्ग सांगत आहे. त्यामुळे भविष्यात अनुचित प्रकार घडण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी वेळीच लक्ष घालून या शिक्षकावर उचित कारवाई करून या शाळेवरून इतरत्र स्थलांतर करावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. तसे न झाल्यास या शाळेवर एखादी अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार या शिक्षकाला पाठीशी घालणारे संबधित अधिकारीच राहील असे बोलल्या जात आहे.

Copyright ©