यवतमाळ राजकीय

प्रहारच्या युवा तालुका अध्यक्ष पदी प्रेम धूर्वे

प्रहारच्या युवा तालुका अध्यक्ष पदी प्रेम धूर्वे

यवतमाळ तालुक्यातील नाका पार्ड्डी येथील युवा सरपंच यांची नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नितीनभाऊ मिर्झापूरे यांनी नियुक्ती पत्र देवून जाहीर केले.प्रेमराज धुर्वे हे
मा.ना.बच्चूभाऊ कडू यांच्या कार्याचा वसा गेली पाच वर्षापासून सतत आपल्या तालुक्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, युवक,विद्यार्थी यांच्यासाठी ” काम करीत जा, फळाची अपेक्षा करू नको” या उक्तीप्रमाणे कार्य करीत गेले आणि लोकांनी कामाची पावती म्हणून यवतमाळ तालुक्यातील पहिला प्रहारचा ” सरपंच ” नाका पार्डी गावामध्ये भरपूर मताधिक्याने निवडून आले अशा विविध प्रकारच्या आंदोलन, उपोषण करून समाजाला न्याय मिळवून दिला आहे त्याची प्रचिती म्हणून आज रोजी नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख नितीन मिर्झापुरे यांच्या हस्ते प्रेमराज धुर्वे यांची यवतमाळ युवा तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी जिल्हा सचिव अंकुश वानखडे, प्रहार विद्यार्थी संघटनेचे रवि राऊत ,मनोहर खडके उपस्थित होते.

Copyright ©