Breaking News यवतमाळ सामाजिक

*रुग्णवाहिकेद्वारे सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या रूग्ण वाहीकेचा पोलिसांनी केला भांडा फोड*

 

रुग्णवाहिकेत होत असलेली सुगंधित तंबाखूची  तस्करी करणाऱ्या दोन तस्कारा सह रुग्ण वाहीका ग्रामीण पोलिसांनी मुद्देमाल सह पकडल्याने गुटखा तस्कारचे धाबे दणाणले
तस्करी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत यवतमाळ येथून आर्णी कडे जात असलेल्या रुग्णवाहिकेचां संशय आल्याने पोलिसांनी त्या रुग्णवाहिकेस किन्ही गावा जवळ थांबून त्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखू चे चार पोते आढळून आले त्या पोत्यामध्ये बबलू गोल्ड सुगंधी तंबाखू एकूण किंमत 28 हजार 800 रुपये किमतीचा हा तंबाखू रुग्णवाहिका क्रमांक एम एच 29 टी 32 56 मारोती ओमणी या रुग्ण वाहिकेस ताब्यात घेतले हि मारुती ओमनी किंमत दोन लाख रुपये असा एकूण दोन लाख 28 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला या वाहनात असणारे प्रदीप थावरा राठोड वय 27 वर्ष राहणार अमराई पुरा आरणी व सय्यद रहमान सय्यद वय 24 राहणार अमरपुरा आर्णी यांना वाहना सह ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे जमादार कैलास लोथे पोलीस कॉन्स्टेबल संदीप मेत्रे ,रुपेश नेवारे ,विकी राऊत व जांभुळकर इत्यादींनी ही कारवाई केली

Copyright ©