यवतमाळ सामाजिक

भांब ( राजा ) येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत

भांब ( राजा ) येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत

जि. पं.प्राथमिक शाळा भांब राजा येथे सौ. अनुप्रिया सुनील डिवरे (सरपंच) यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा घेवून शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून सुरेश रामदासजी बोद्रे व सुनीलभाऊ नारायण डीवरे हे होते
तर अनेक पालक वार्गानी बहुसंख्येने उपस्थितीत दर्शविली होती. यामध्ये सौ. भाग्यश्री सतीश देवतळे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ) पुंडलिक लोभा राठोड (उपाध्यक्ष -)व्यवस्थापन समिती यांची निवड करण्यात आली तसेच दत्ता राठोड ( उपसरपंच )सौ. मनीषा सोनवणे,(ग्रा. पं. सदस्य ) सौ. रेखा काकडे, (ग्रा प सदस्य ) हे उपस्थित होते. अनिल पेंथे यांची शिक्षण तज्ञ म्हूणन निवड करण्यात आली. तेव्हा गौतम देवतळे, प्रणय वानखडे , मनोज मेश्राम, धम्मानंद रामटेक, दुर्योधन रामटेके, सौ. रुपाली तिजारे,मंगेश बागडे, तसेच मुख्याध्यापक संतोष मरगडे , शिक्षीका अकांक्षा निनगुरकर, सोनाली बरडे, उपस्थित होते.

Copyright ©