यवतमाळ सामाजिक

ग्राम सवांद सरपंच असोसिएशनच्या अमरावती विभाग विदर्भ संपर्क प्रमुखपदी यादव गावंडे यांची निवड

ग्राम सवांद सरपंच असोसिएशनच्या अमरावती विभाग विदर्भ संपर्क प्रमुखपदी यादव गावंडे यांची निवड

सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहणारे सामाजिक कार्यकर्ते यादव गावंडे यांचे कार्य बघता सरपंच संवाद असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी यादव वसंतराव गावंडे रा.मांडवा ता.दिग्रस यांची अमरावती विदर्भ संपर्क प्रमुखपदी निवड करून नियुक्तीपत्र देऊन नुकतीच निवड केली आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा पदी यादव गावंडे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामपंचायतीच्या सर्वांगिण विकासाकरिता ग्राम सवांद संघटना काम करत आहे. संघटनेमार्फत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना त्यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देऊन शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा मुख्य हेतु आहे.हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन यादव गावंडे यांची अमरावती विभाग विदर्भ संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. यादव गावंडे यांनी शेतकऱ्याच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने करून न्याय देण्याचे कार्य सतत करतात. शेतकऱ्याचे पीक विमा प्रश्न ,अतिवृष्टी , विद्यार्थ्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात.कामगारांचे विविध आदी अडचणी सोडविण्यासाठी ते कसोटीचे प्रयत्न करतात.

—चौकट —-

ग्राम संवाद संघटनेच्या माध्यमातून दुर्बल घटक, गोर गरीब वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमी तत्पर राहणार असून या घटकातील नागरिकांनी आपल्या असलेल्या समस्या सांगाव्या तसेच सरपंच यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहील. सरपंच व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तुमच्या न्याय व रास्त मागणीसाठी मला आंदोलने करण्याचे काम पडले तरी मी त्यासाठी नेहमी तयार राहील

– यादव गावंडे, ग्राम संवाद विदर्भ संपर्क प्रमुख

Copyright ©