यवतमाळ सामाजिक

बिरसा मुंडा जयंतीत सहभागी होणाऱ्या युवकांवर हल्ला

बिरसा मुंडा जयंतीत सहभागी होणाऱ्या युवकांवर हल्ला
——————————————-
यवतमाळ: स्थानिक तलावफैल येथे दिनांक 15 नोव्हेम्बर 2021 रोजी बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम आटोपून घरी परत येत असणाऱ्या मुलांना तलावफैल पॉवर हॉउस येथील गुंड प्रवृत्तीतच्या मुलांनी शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन त्यांच्यावर किमान दहा मुलांनी हल्ला केला. हल्ले खोरांच्या हातात चाकु तलवार,लोखंडी रॉड,आणि दोघांकडे बंदूक असे शस्त्र जवळ बाळगून हल्ला केल्याचा तक्रारदारानी आरोप केला आहे. आणि क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या विषय अश्लील शिविगाळ आणि अशोभनीय वक्तव्य केले आणि परिसरात उभ्या असणाऱ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात तोड़ फोड़ करुण नुकसान केले. परिसरात तोड़ फोड़ करने जनु काही यांचे व्यसन झाले आहे.या पूर्वी सुद्धा यांच्याकडून तोड़ फोड़ झाल्याच्या तक्रारीत दाखल आहे.परंतु आता मात्र यांच्याकडून चक्क जीवाचा धोका निर्माण झालेला असून सुध्दा हे आरोपी अजूनही पोलिसांच्या हातात नाही लागले या मुळे तक्रार कर्त्यांचे आंदोलन करण्याची तैयारी असल्याचे दिसून येत आहे.माहिती मिळाल्या नुसार हल्ला करणारे हे शहरातील नामवंत गुंड असून त्यांच्यावर भा द वी 302,307,324,असे कित्येक गुन्हे दाखल आहे. मात्र त्यांना कधीच शासन झाले असे दिसत नाही. तसेच शहरामध्ये यांचे दारू आणि अमली पदार्थांचे मोठे व्यवसायही चालत असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली आहे. त्यामुळे या अट्टल गुन्हेगाराची कसून चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार संतोष मडावी व मोहन उर्फ गजानन कोडापे यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे.

Copyright ©