यवतमाळ सामाजिक

दिग्रस तालुक्यात अवतरला “शिवकालीन इतिहास…” “शिवतेज” किल्लोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद…!

दिग्रस तालुक्यात अवतरला “शिवकालीन इतिहास…”

“शिवतेज” किल्लोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद…!!

जलदूर्ग,गिरिदुर्ग, वनदूर्ग,भूईकोट किल्ले….प्रतापगड, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, रायगड, विजयदुर्ग, शिवनेरी, लोहगड…इत्यादी एकापेक्षा एक सरस किल्ले… अन् त्यात तोफखाना, बारूदखाना, धान्याचे कोठार,भूयार,चोर दरवाजा, रस्ते, बाजारपेठ, दीपमाळ, पाण्याच्या टाक्या,तलाव,तबेले,खंदक,बुरूज,विहीर, हौद,मंदीर,जनानखाना, आखाडा, कुस्तीचे मैदान, शस्त्रागार ….पाहून असं वाटलं जणू आपण शिवकालीन ऐतिहासिक युगाची सहल करीत आहोत..!! होय,ऐतिहासिक युगाची सहल…!! निमित्त होते…”शिवतेज किल्लोत्सव”,या स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग लाभला.
दिग्रस तालूक्यात शिवतेज संघटना दरवर्षी दिवाळीच्या सुट्यांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करीत असते.यंदाचे हे पंधरावे वर्ष आहे. याहीवर्षी स्पर्धकांनी आपल्या घराच्या अंगणात, मैदानात, गच्चीवर,खोलीत दगडमाती, विटा,सिमेंटच्या साह्याने उत्कृष्ट असे भव्य किल्ल्यांची उभारणी केलीव स्पर्धेत चुरस निर्माण केली.
आज या स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. प्रा.अशोक तायडे,प्रा.स्नेहा चिंतावार, आरती पद्मावार, उत्तम जाधव गुरुजी (पुसद),संदीप झाडे व शिवतेज चे सर्वच संचालक व प्रतिष्ठित नागरिक यांचे उपस्थितीत सावंगा बु”,धानोरा बु”,दिग्रस, चिंचोली क्र.२ येथील २२ किल्ल्यांचे परिक्षण केले.व सर्व किल्ले नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले.
शिवतेज संघटनेचे संस्थापक तथा संयोजक संतोष झाडे गुरुजी, सुशील घोलप,वसंत खोडके, संजीव लोखंडे, ऋषिकेश हिरास, विजयालक्ष्मी झाडे,लक्ष्मण गावंडे आदींनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. लवकरच या स्पर्धेचे बक्षिस वितरण मान्यवरांचे हस्तक्षेप करण्यात येणार आहे असे आयोजकांनी स्पष्ट केले.

Copyright ©