यवतमाळ राजकीय

केंद्र सरकारच्या पेट्रोल दरवाढीविरोधात, युवासेनेकडुन सायकल रॅली व काळ्या फिती बांधुन निषेध

वणी प्रतिनिधी निलेश चौधरी

केंद्र सरकारच्या पेट्रोल दरवाढीविरोधात, युवासेनेकडुन सायकल रॅली व काळ्या फिती बांधुन निषेध

केंद्र सरकारने डीझेल व पेट्रोलच्या किमतीमध्ये, दिवसेंदिवस दरवाढ केल्याच्या निषेधार्थ ,युवासेनेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.आज सकाळच्या सुमारास शिवाजी महाराज चौकातून निषेध रॅलीची सुरुवात करण्यात आली होती. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात ,काळ्या फिती बांधून नारेबाजी करुन केंद्र सरकारचा तीव्र निषेध दर्शविण्यात आला. रॅली मध्ये मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग होता .यावेळी बैलगाडीवर दुचाकी ठेवून ,संपूर्ण शहरात फिरविण्यात आल्याने , या अनोख्या आंदोलनाची संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात ,चर्चेला उधाण आले होते.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात,युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते.यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, उपजिल्हाप्रमुख कुंदन टोंगे, जिल्हा समनव्यक सतीश वाहराटे ,झरी तालुकाप्रमुख निलेश बेलेकर, गणेश आसुटकर, सौरभ खडसे , बंटी येरणे, कुणाल लोणारे, सचिन पाटील, राजू गोलाईत, प्रवीण वरारकर, दानिश खान ,राकेश दुर्गे, व युवतीसेनेचे मिनालताई गौरकार, अभिशा गौरकार , वृंदा नागरकर,संकेत गोस्कुलवार, गोलू उईके, दत्ता आमडे, स्वप्नील आगीरकार, सौरभ मंडलवार, प्रशिक बरडे, वैभव मेश्राम, निखिल निखाडे,हर्षल पुसाठे, सौरभ वानखडे, हेमंत गौरकार, शिवराम चिडे ,पवन भाऊ राऊत ईत्यादी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते..

Copyright ©