यवतमाळ सामाजिक

इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती कार्यक्रम संपन्न

इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती कार्यक्रम संपन्न

बळीराम पाटील महाविद्यालय किनवट राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 31 ऑक्टोंबर रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय संकल्प दिवस व राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांचे देशाच्या स्वातंत्र्यपूर्व लढ्यात व स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासात फार मोठे योगदान होते असे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार म्हणाले .सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव,प्रा. डॉ. पंजाब शेरे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रमुख प्रा. शिवदास बोकडे, प्रा. ज्ञानेश्वर चाटे. सुधीर पाटील, छत्रपती रिंगनमोडे ,सोहम चाटे, आदींनी या दोन्ही महान व्यक्तींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

Copyright ©