Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या २४ तासात तीन बाधित ; एक कोरोनामुक्त

गेल्या २४ तासात तीन बाधित ; एक कोरोनामुक्त

यवतमाळ दि. 28 ऑक्टोबर : गेल्या २४ तासात जिल्ह्यात तीन नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तर एक जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात पाच व बाहेरजिल्ह्यात एक अशी एकूण सहा आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण ४७८ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित ४७५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ७२९०५, आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या ७१११२,आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १७८७ मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये राळेगाव येथील एक पुरूष, पांढरकवडा येथील एक पुरूष व इतर शहरातील एका पुरूषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष ५७ हजार ५९१ चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष ८४ हजार ५८५ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर ९.६२ असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी ०.६३ आहे तर मृत्यूदर २.४५ आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात २१६१ बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ११ डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि १६ खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या २१७४ आहे. यापैकी १३ बेड रुग्णांसाठी उपयोगात आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ७८७ बेडपैकी १३ बेड रुग्णांसाठी उपयोगात असून ७७४ बेड शिल्लक, ११ डीसीएचसीमध्ये एकूण ७५५ बेडपैकी पुर्ण ७५५ बेड शिल्लक आणि १६ खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण ६३२ बेडपैकी पुर्ण ६३२ बेड शिल्लक आहेत.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©