यवतमाळ सामाजिक

बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथे मिशन युवा स्वस्थ्य अंतर्गत कोवीड-१९ लसीकरण शिबिर संपन्न

किनवट प्रतिनिधी राज माहुरकर

बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथे मिशन युवा स्वस्थ्य अंतर्गत कोवीड-१९ लसीकरण शिबिर संपन्न

बळीराम पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किनवट राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२८/१०/२०२१ रोजी कोवीड-१९ लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कोवीड -१९ चे शंभर टक्के लसीकरण करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग आणि महाविद्यालय यांनी संयुक्तपणे काम केले. सदरील शिबीरामध्ये विध्यार्थी व नागरिकांनी लसीकरनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. लसीकरण सकाळी १०:०० पासून सुरु झाले. तब्बल दीड वर्षाच्या करोना अवकाशानंतर २० ऑक्टोबर पासून विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित झाले आहेत. त्यातील बरेचजण लसीकरण केलेले नाहीत. देशाने शंभर करोड लसीकरणाचा टप्पा गाठला असलातरी अजूनही काही विद्यार्थी लसीकरणाच्या बाबतीत फारसे गंभीर नाहीत, त्यामुळे महाविद्यालय रासेयो विभाग व स्थानिक आरोग्य यंत्रणा यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’ व ‘युवा स्वास्थ्यअभियान’ राबवत आहेत. ह्या अनुषंगाने दिनांक २८ ऑक्टोबर रोजी प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड लसीकरण शिबीर घेण्यात आले. या शिबिरास विद्यार्थी व शिक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ९५ जणांनी लसीकरण करून घेतले. या शिबीररास वैद्यकीय आधिकारी डॉ उत्तम धुमाळे, पंकज राठोड समुपदेशक , नर्स रेखा मेश्राम, व विशेष परीश्रम घतले.आरोग्य कर्मचाऱ्यांनी
कोव्हीशीएल्ड आणि कोव्हेकशीन प्रथम व द्वितीय डोस चे लसीकरण केले.

या शिबिरात महाविद्यालय, व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवक राष्ट्रीय छात्र सेना कँडेट व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या युवा स्वास्थ्य अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी२१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान १०० टक्के कर्मचारी आणि १८ वर्षावरील विद्यार्थी यांचे लसीकरण उद्दिष्ट ठेवले आहे.ते दिनांक २८ आक्टोबर २०२१ शिबिरात सफल केले आहे.
युवा स्वास्थ्य मोहीम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. एस.के.बेबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने, प्रा.पुरूषोत्तम यरडलावार,रासेयो सल्लागार डॉ ए.पी.भालेराव,डॉ जी.बी.लांब,डॉ सुरेन्द शिंदे, डॉ शुंभागी दिवे,महीला कार्यक्रम आधिकारी प्रा.सुलोचना जाधव,डॉ. स्वाती कुरमे,प्रा.प्रल्हाद जाधव, सुधीर पाटील, पुर्वशी राठोड, छत्रपती रिंगणमोडे इ.परिश्रम घेतले.

Copyright ©