यवतमाळ सामाजिक

१७ लक्ष खर्चून बांधलेल्या इमारतीस तलाठ्याची प्रतीक्षा

१७ लक्ष खर्चून बांधलेल्या इमारतीस तलाठ्याची प्रतीक्षा

हिवरी येथील तलाठ्याचे कार्यालय व निवासस्थानाचे बांधकाम मागील दोन वर्षा पासून पूर्ण झाले या कार्यालयास १७.६० हजार इतका खर्च करण्यात आला परंतु अजूनही या कार्यालयात एकही तलाठी फिरकला नाही हि इमारत धुळखात पडलेली आहे या मध्ये ना तलाठी येत ना मंडळ अधिकारी त्या मुळे हि इमारत केवळ शोभेची इमारत झाल्याने सर्वसामान्यांचे कामेच होत नाही हि बाब गंभीर जरी असली तरी प्रशासनास गंभीरता नाही तलाठी कधी येताहेत कुठे बसतात या बाबत कुणालाही थांग पत्ताच लागत नाही अनेकांना कागद पत्रा करीता वन वन भटकावे लागते मात्र काम काही होत नाही हि इमारत इतर कामा करिताच वापरण्यात येत आहे या इमारतीचे उद्घाटन होण्या पूर्वीच पडणार की काय अशी शंका वेक्त करण्यात येत आहे आमदार निधी मधून झालेल्या या इमारतीचं भविष्य धोक्यात आलं आहे या तलाठयाची प्रतीक्षा असलेल्या इमारतीस तलाठी द्याल का असा सवाल करण्यात येत आहे.हे कार्यालय आणि निवास स्थान म्हणून बांधण्यात आले आहे मात्र ते अजूनही दुर्लक्षितच आहे या निवासस्थानी तलाठी आल्यास अनेकांचे कामे सोयीस्कर होईल अशी अपेक्षा वेक्त करण्यात येत आहे

Copyright ©